AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूरज चव्हाणला चित्रपटातील रोल झेपेल का? मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

या चित्रपटात अभिनेता सूरज चव्हाण, जुई भागवत यांच्यासोबत दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार झळकत आहे. आता नुकतंच अभिनेते मिलिंद गवळी यांनी सूरज चव्हाणबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

सूरज चव्हाणला चित्रपटातील रोल झेपेल का? मिलिंद गवळींच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष
suraj chavan milind gawali
| Updated on: Apr 18, 2025 | 8:09 PM
Share

‘बिग बॉस मराठीचा ५’ चा विजेता सूरज चव्हाण हा लवकरच ‘झापूक झुपूक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदेंनी केले आहे. येत्या २५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर, गाणी सुपरहिट ठरताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेता सूरज चव्हाण, जुई भागवत यांच्यासोबत दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार झळकत आहे. आता नुकतंच अभिनेते मिलिंद गवळी यांनी सूरज चव्हाणबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी चित्रपटातील कलाकारांसोबत फोटो शेअर केले आहेत. त्यांनी या कलाकारांबद्दल भाष्य केले आहे. यात त्यांनी सूरज चव्हाणबद्दल काय वाटते, हे मनमोकळेपणाने सांगितले आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“निर्मळ, निरागस, मनाने चांगला, प्रेमळ, जिद्दी, मोठी मोठी स्वप्न पाहणारा, कधीही हार न मानणारा, स्वतःचे ठाम विचार असणार, लहान वयात आई-वडिलांचं छत्रछाया हरवल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणारा, humiliation rejection पचवून त्यावर मात करणारा, आपल्या पाचही बहिणींवर खूप खूप माया करणारा, स्पष्ट शब्द उच्चारता न येता मनातल्या भावना अचूक व्यक्त करणारा. स्वतःची एक वेगळी style निर्माण करणारा, हिंदी आणि दक्षिणातल्या सुपरस्टारस पेक्षा भारी swag असलेला सुरज चव्हाण.

काही महिन्यापूर्वी “झापुक झूपुक” चित्रपटाच्या script reading साठी यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये पहिल्यांदा मी सुरज ला भेटलो, आणि आमच्यात फक्त hi, hello, नमस्कार झालं, तो एक लाजरा मुलगा आहे असं मला भासलं, माझ्या मनात एक शंका आली, की या सिनेमातला मध्यवर्ती सशक्त रोल याला झेपेल का? केदार शिंदे यांनी मोठं शिवधनुष्यच उचलं आहे, सुरज शी माझी दुसरी भेट costume trialच्या दिवशी अंधेरीच्या स्टुडिओमध्ये झाली, त्यादिवशी मला बघताच त्यांनी एक छानशी घट्ट प्रेमळ मिठी मारली, तो आता थोडा खुलंलेला दिसला, त्याच्याशी तिसरी भेट शूटिंग लोकेशन च्या ठिकाणी वाई मध्ये झाली, आणि तेव्हा तो मला खूप confident दिसला.

आम्ही भेटताच क्षणी परत एकदा एकमेकांना घट्ट मिठी मारली, त्या मिठी मध्ये खूप warmth आणि purity होती, जी या सिनेमा क्षेत्रात खूप कमी अनुभवायला मिळते, अनेक वर्षांमध्ये मी formality च्या मिठ्या, hugs, देखल्या देवा दंडवत, खोट्या smiles, पाठ फिरताच एकमेकांना नाव ठेवणे, त्यात सुरज सारखी निर्मळ माणसे भेटले की मनाला खूप छान वाटतं, shooting set वर त्याच्याशी बोलताना तो म्हणाला “या सिनेमात काम करायची त्याला भीती वाटत होती, दडपण आलं होतं, केदार सर आहेत ना मग मी करू शकतो , हार मानायची नाही”, आणि खरंच डबिंग च्या वेळेला त्याचं काम बघितलं आणि मी थक्कच झालो, फारच सुंदर अभिनय केला आहे त्याने, जिद्द, कष्ट करायची तयारी, आणि खूप नम्रता.

या मुलांमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा इतका positive attitude, माझी मनापासून इच्छा आहे मायबाप प्रेक्षकांने त्याला भरभरून यश द्यावं, त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्याला यश नक्की मिळणार. सुरज बरोबर “झोपुक झुपूक” मध्ये अजून काही young talented कलाकार आहे, जुई भागवत, इंद्रनील कामत, पायल जाधव, हेमंत फरांदे. आणि अजून सहा चेल्ले पिल्ले आहेत. या सगळ्यांची कामं प्रेक्षकांना खूप आवडतील, या गोड पोरांना, @jiostudios team ना, केदारजी शिंदे team यांना, माझ्या झापुक झुपूक सिनेमाच्या संपूर्ण टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा”, असे मिलिंद गवळी यांनी म्हटले.

दरम्यान ‘झापुक झुपुक’ या चित्रपटात सूरज चव्हाण, जुई भागवत यांच्याबरोबरच इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी असे अनेक लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या ट्रेलरमध्ये सूरजचे निरागस आणि रौद्र अशी दोन्ही रूपे पाहायला मिळत आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा