दुरावलेली फॅमिली एक व्हायला…, मराठी अभिनेत्याची पोस्ट सर्वत्र व्हायरल
Hich Khari Family: दुरावलेली फॅमिली एक व्हायला..., मराठी अभिनेत्याच्या सोशल मीडिया पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष.. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा...

Hich Khari Family: हिंदी सक्ती धोरणाचा जीआर रद्द होण्यापूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी भाषा सक्ती विरोधात एकत्रित रस्त्यावर उतरणार होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विजयी मेळावा साजरा करण्याचा निर्णय घेतला. 5 जुलै रोजी वरळी याठिकाणी भव्य विजयी मोळावा होणार आहे. मेळाव्याची तयारी देखील जोरदार सुरु आहे. सांगायचं झाली हिंदी भाषा सक्तीला विरोध करत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.
येत्या 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा पार पडणार आहे. या विजयी मेळाव्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरु असताना अभिनेता सागर कारंडे याची पोस्ट चर्चेत आली आहे. सांगायचं झालं तर, या विजयी मेळाव्यात अनेक मराठी कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. अनेक कलाकारांनी यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. आता अभिनेता सागर कारंडे याची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सागर कारंडे याने एका पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये ‘हीच खरी फॅमिलीची गंमत आहे’ असं लिहिलं आहे. तर पोस्टरवर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , उद्धव आणि राज ठाकरे यांचा Ghibli Art वापरून तयार करण्यात आलेला एक फोटो पोस्ट करण्यात आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे…
फोटो शेअर करत त्याने सकाळी वरळीमध्ये जल्लोष, दुपारी दादरमध्ये गंमत! हे नाटक फॅमिलीसह बघण्यातच खरी गंमत आहे… असं देखील लिहिलं आहे. शिवाय पोस्टरच्या वरच्या भागात ‘योग्य वेळ आली की दुरावलेली फॅमिली एक व्हायला वेळ लागत नाही…’ सध्या सर्वत्र अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होत आहे.
