VIDEO | “झुडपात लपून गुरगुरणारे लांडगे…” बिल्डरच्या मुजोरीमुळे महिनाभर पाणी नाही, अभिनेता समीर खांडेकरचा संताप

बोरिवलीतील सोसायटीत महिन्याभरापासून पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे, याविषयी समीरने फेसबुकवर लाईव्ह येत वाचा फोडली. (Actor Sameer Khandekar Builder)

VIDEO | झुडपात लपून गुरगुरणारे लांडगे... बिल्डरच्या मुजोरीमुळे महिनाभर पाणी नाही, अभिनेता समीर खांडेकरचा संताप
अभिनेता समीर खांडेकर
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 11:37 AM

मुंबई : लोकप्रिय मराठी अभिनेता समीर खांडेकरने (Sameer Khandekar) बिल्डरच्या मनमानी कारभाराविरोधात सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. “झुडपांत लपून गुरगुरणाऱ्या लांडग्यांना जरा फेमस करुया” असं म्हणत समीरने आपल्या बिल्डिंगच्या बांधकाम व्यावसायिकाविषयी संताप व्यक्त केला आहे. समीर राहत असलेल्या बोरिवलीतील सोसायटीत महिन्याभरापासून पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे, याविषयी त्याने फेसबुकवर लाईव्ह येत वाचा फोडली. (Marathi Actor Sameer Khandekar lashes out at Builder)

तीन वर्षांनंतर पझेशन

काहे दिया परदेस, वैजू नंबर वन यासारख्या मालिका आणि काही नाटकांतून समीर खांडेकरने अभिनय केला आहे. “बोरिवली पूर्वेला असलेल्या वृंदावन सोसायटीत मी राहतो. आमचं छान खूपच घर आहे. अनेक जणांना ते आवडलं, त्यांनी इथे येऊन फोटो काढले. पैसे जमवून आम्ही आमच्या स्वप्नातील घर विकत घेतलं. खरं तर बिल्डरने आम्हाला हे घर 2017 मध्येच देणं अपेक्षित होतं. पण आम्हाला ते 2020 मध्ये मिळालं. तीन वर्षे झगडून आम्ही आमचं घर मिळवलं. या काळात भाड्याचा खर्च, मनस्ताप झाला. बिल्डरला आम्ही विनंती केली, पण त्याने आम्हाला हुसकावून लावलं. आम्ही कोर्टात केस केली आणि जिंकलोही. त्यानंतर झालं गेलं विसरुन इथं राहावं असं आम्ही ठरवलं.” असं सांगत समीरने आपली समस्या सांगण्यास सुरुवात केली.

बीएमसीने पाण्याची लाईन कापली

“बिल्डरच्या मनात आम्ही सुखाने जगावं असं दिसत नाही. त्याची चांगलीच ‘ख्याती’ महापालिकेत असल्याचं आम्हाला नंतर समजलं. पण गेल्या महिन्याभरापासून एक नवी समस्या समोर उभी राहिली आहे. आमच्या इमारतीत पाणीच येत नाही. आम्ही पाण्याशिवाय तडफडतो आहोत. त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी बीएमसीचे लोक आले आणि त्यांनी पाण्याची लाईनच काढली. आम्ही त्यांना विचारलं तेव्हा त्यांचं उत्तर ऐकून आम्ही चक्रावलो. आमच्या बिल्डरने आमच्या इमारतीसाठी पाण्याची अधिकृत लाईन दिलीच नाही. त्यांनी देऊ केलेलं पाणी कुठून तरी चोरलं होतं. अद्ययावत सोसायटी केवळ कागदावर, रिअॅलिटीमध्ये काही नाही. मालमत्ता कर भरलाच नाही, त्याशिवाय अधिकृत पाणी मिळणार नाही” असं बीएमसीने सांगितल्याचं समीर म्हणाला.

पोलिसात जाऊनही बिल्डर बधेना

“दिग्गज अभिनेते अविनाश नारकर यांच्या ओळखीतून आम्ही आमचे खासदार गोपाळ शेट्टी यांनाही भेटलो. त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. पोलीसातही तक्रार केली. आमच्या विभागातील कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या एसीपींनी बिल्डरच्या माणसाला बोलावून फसवणुकीची तक्रार दाखल करण्याची ताकीदही दिली. पण त्याचा काहीच फरक पडलेला नाही. आता त्याच्या म्हणण्यानुसार इमारतीतल्या सर्वांनी मालमत्ता कर भरावा. फ्लॅट घेतानाच प्रत्येकाने पाण्याच्या कनेक्शनसाठी 98 हजार रुपये भरले आहेत. मेंटेनन्सही आधीच भरलेला आहे. एक कोटी आठ लाख रुपयांची एकूण रक्कम बिल्डरकडे जमा आहे. बिल्डरने 2013 पासून मालमत्ता कर भरलेलाच नाही. तो भरल्यानंतरच पाण्याची लाईन दिली जाईल, असंही पालिकेनं सांगितलं आहे. असं असताना आता आम्ही पुन्हा रक्कम का भरावी?” असा उद्विग्न सवाल समीरने व्हिडीओतून विचारला आहे. (Marathi Actor Sameer Khandekar lashes out at Builder)

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

“अत्यंत घाण भाषेत आम्हीही रिअ‍ॅक्ट होऊ शकतो” प्रेक्षकाच्या अश्लाघ्य टीकेवर अभिनेता शशांक केतकर संतापला

VIDEO | “तू बुधवार पेठेतील ** आहेस” इन्स्टाग्राम युझरच्या कमेंटवर मानसी नाईकचं लाईव्ह उत्तर

(Marathi Actor Sameer Khandekar lashes out at Builder)

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.