AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत शेलारची अवस्था पाहून चाहते चिंतेत…! अभिनेता ओळखूही येईना, का झालंय इतकं वजन कमी?

Sushant Shelar Health Update: अभिनेता सुशांत शेलार याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्याला पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अभिनेत्याचं इतकं का वजन कमी झालं आहे. असा प्रश्न देखील चाहत्यांकडून उपस्थित होत आहे.

सुशांत शेलारची अवस्था पाहून चाहते चिंतेत...! अभिनेता ओळखूही येईना, का झालंय इतकं वजन कमी?
अभिनेता सुशांत शेलार
| Updated on: Jul 25, 2026 | 2:40 PM
Share

Sushant Shelar Health Update: अभिनेता सुशांत शेलार याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील अभिनेत्याला भरभरून प्रेम दिलं. पण नुकताच समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे सुशांत याच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. सुशांत याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्याला पाहिल्यानंतर पुन्हा चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत यांच्या प्रकृतीची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर खुद्द अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

सुशांत शेलार याचं वजन का कमी झालं? यावर अभिनेता म्हणाला, ‘मी एका फिल्मसाठी 8 – 10 किलो वजन कमी केलं आहे आणि त्यानंतर फूड पॉयझनिंग झालं… त्यामुळे माझं पुन्हा वजन कमी झालं. शारीरातलं जे काही फॅट होतं, ते सरळं फॅट निघून गेलं..’ असं देखील अभिनेता एका मुलाखतीत म्हणाला. अभिनेत्याला पाहिल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. पूर्वी गुबगुबीत दिसणाऱ्या सुशांत याला ओळखणं देखील कठीण झालं आहे…

सांगायचं झालं तर, ‘धर्मवीर 2’ सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरमध्ये अभिनेत्याला स्पॉट करण्यात आलं होतं. प्रीमियरनंतर अभिनेत्याच्या प्रकृतीची चर्चा रंगली. सुशांत शेलार याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याला कोणता आजार झाला आहे का? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागली. यावर खुद्द अभिनेत्याने माहिती दिली आहे. ‘मला कोणताही आजार झालेला नाही. माझी प्रकृती स्थिर आहे. तुम्ही व्यक्त केलेली चिंता आणि काळजी याचा आरद राखतो…’

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला ग्लुटनसह इतर काही पदार्थांची ॲलर्जी होती. त्यामुळे डॉक्टरांनी अभिनेत्याला काही पदार्थ न खाण्याचा देखील सल्ला दिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत शेलार याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

कोणते पदार्थ सुशांत शेलार याला वर्ज्य?

Food Poisoning नंतर डॉक्टरांनी अभिनेत्याला काही पदार्थ खाण्यास मनाई केली आहे. गहू शिवाय वडापाव, बटाटा, दूध यांसारखे पदार्थ अभिनेत्याला वर्ज्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत शेलार याचं वजन 8 ते 10 किलो वजन कमी झालं आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच