AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुयश टिळकच्या गाडीचा अपघात, तासभर मदतीची प्रतीक्षा, म्हणाला ‘6-7 तास हायवेवरून ओढत..’

अभिनेता सुयश टिळकने त्याच्या गाडीच्या अपघाताचा किस्सा सोशल मीडियावर सांगितला आहे. त्याचसोबत त्याने एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सुयशची अपघातग्रस्त गाडी टोईंग करून नेत असल्याचं पहायला मिळत आहे.

सुयश टिळकच्या गाडीचा अपघात, तासभर मदतीची प्रतीक्षा, म्हणाला '6-7 तास हायवेवरून ओढत..'
Suyash Tilak's car accidentImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 11, 2025 | 10:20 AM
Share

मराठमोळा अभिनेता सुयश टिळकच्या कारचा अपघात झाला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु हा अपघात अशा ठिकाणी झाला, जिथे त्याला सहज मदत मिळणं शक्य नव्हतं. अखेर त्याची गाडी टोईंगने मुंबईपर्यंत आणली गेली. या संपूर्ण सहा ते सात तासांच्या प्रवासादरम्यान सुयश त्याच्या बंद गाडीतच बसून होता. परंतु या संपूर्ण घटनेचा त्याने व्हिडीओ शूट केला असून तोच आता इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. आयुष्यात कधी कधी अशा गोष्टी घडतात, ज्यांचा आपल्याला स्वीकार करावाच लागतो, ही गोष्ट त्याला या घटनेतून शिकायला मिळाली.

सुयश टिळकची पोस्ट-

‘गाडी न चालवताच सर्वांत लांब ड्राइव्हिंग झाली. माझ्या गाडीचा छोटा अपघात झाला. सुदैवाने त्यात कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु माझ्या गाडीचं खूप नुकसान झालं. या अपघातात मला किंवा इतर कोणालाही दुखापत झाली नाही. पण ही घटना अशा ठिकाणी झाली, जिथे मला मदत मिळत नव्हती. मग घरी परतण्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग शिल्लक होता, तो म्हणजे मुंबईला घरापर्यंत माझी गाडी टोईंग करून नेणं. जवळपास तासभर प्रतीक्षा केल्यानंतर मला मदत मिळाली. गाडी टो करणाऱ्या ड्राइव्हरने मला माझ्या गाडीतच बसायला सांगितलं. “जर कदाचित गाडीला काही मदत लागली तर..” असं तो म्हणाला. मदत? ती श्वासही घेत नाही,’ असं सुयशने उपरोधिकपणे लिहिलं.

याविषयी तो पुढे म्हणाला, ‘मला मौन बाळगून माझ्या गाडीत बसावं लागलं. एसी नसलेल्या त्या गाडीतून मला सहा ते सात तास हायवेवरून ओढत नेण्यात आलं. लोक कुतुहलाने माझ्याकडे आणि गाडीकडे बघत होते, काही जण माझ्या नशिबावर हसत होते, तर नेमकं काय झालंय, असा प्रश्न काहींना पडला होता. अशा परिस्थितीत माझा राग अनावर झाला असता, मी चिडू शकलो असतो, मी तक्रारी करत बसू शकलो असतो. परंतु कधी कधी आयुष्य तुम्हाला जे अनुभव देईल, त्याचा फक्त स्वीकार करायचा असतो.’

View this post on Instagram

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

‘मी पुस्तक वाचलं, गाणी ऐकली, झोप काढली. गाडीच्या असामान्य हलत्या थिएटर सीटवरून मी जग फिरताना पाहिलं. माझ्या संपूर्ण दिवसाचा मी व्हिडीओ काढला आणि त्या मोठ्या व्हिडीओचा मिनी व्लॉग तयार केला. तुम्हीसुद्धा एंजॉय करा. कधीकधी, तुम्हाला आवडो अथवा न आवडो, आयुष्य तुम्हाला ओढून नेत असते. तुम्ही हा प्रवास रागात घालवू शकता किंवा तुमची खिडकी उघडून मोकळा श्वास घेऊ शकता आणि प्रवासाचा आनंद घेऊ शकता,’ असं त्याने पोस्टच्या अखेरीस म्हटलंय.

या व्हिडीओच्या अखेरीस त्याने एक गमतीशीर संदेशसुद्धा लिहिला आहे. ‘जेव्हा आयुष्य तुम्हाला लिंबू देतं, तेव्हा त्यातून लिंबू सरबत बनवा’ अशी एक म्हण सर्वांनाच माहीत असेल. परंतु सुयशने याच म्हणीचा एक वेगळा व्हर्जन चाहत्यांना सांगितला आहे. ‘जेव्हा आयुष्य तुम्हाला लिंबू देतं, तेव्हा आंब्याचा ज्युस बनवा आणि सर्वांनाच चकीत करा’, असं त्याने लिहिलंय. सुयशच्या या व्हिडीओ आणि पोस्टवर नेटकऱ्यांकडून आणि सेलिब्रिटींकडूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.