अमृता खानविलकर कुठे करायची काम… काऊंटर पुसायची… काच पुसायची… कशी झाली स्टार? मोठं सत्य समोर
Amruta Khanvilkar First Salary : काऊंटर पुसायची... काच पुसायची... कुठे काम करायची अमृता खानविलकर... पहिली नोकरी आणि पहिल्या पगाराबद्दल अभिनेत्रीकडून खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमृता हिची चर्चा...

Amruta Khanvilkar First Salary : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री अमृता खानविलकर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. फक्त मराठीच नाही तर, हिंदी सिनेविश्वात देखील अमृता हिने स्वतःचं नाव मोठं केलं आहे. अमृताने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर रुपेरी पडद्यावर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज रॉयल आणि आलिशान आयुष्य जगणाऱ्या अमृता हिची सुरुवात मात्र कोणाला माहिती देखील नसेल. एका साध्या दुकानात अमृता काम करायची… शिवाय तिचा पगार देखील फार कमी होता… एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल मोठा खुलासा केला. अभिनय विश्वात काम करण्यापूर्वी अमृता हिने अनेक ठिकाणी काम केलं आहे. अभिनेत्रीने चश्म्याच्या दुकानात देखील काम केलं आहे. चश्म्याच्या दुकानात अमृता हिने झाडू पासून काचा पुसण्याचं देखील काम केलं आहे… अमृता हिच्या पडद्यामागची गोष्ट तुम्हाला देखील थक्क करेल…
एका मुलाखतीत अमृता म्हणाली, ‘सुयोग ऑप्टिक्समध्ये काऊंटवर मी लेन्स विकायचे. त्या ऑप्टिक्समध्ये मी जवळपास दीड महिने काम केलं. तेव्हा माझा पगार फक्त 500 रुपये होता. त्या काकांनी पहिल्या दिवशी बक्षीस म्हणून 50 रुपये दिले होते. ते माझ्या कमाईचे 50 रुपये होते… मी तिथे काऊंटर पुसायचे, काचा पुसायचे… अशी सगळी कामं मी केली आहेत…’
‘दुकासमोर एक होर्डिंग असायचं… माझ्या मनात एक कायम इच्छा असायची, त्या होर्डिंगकडे पाहिल्यानंतर मला कामय वाटायचं मी कधी त्या होर्डिंगवर येईल… त्यानंतर हळू – हळू मॉडेलिंग करायला सुरुवात केली. साड्यांच्या कॅटलॉगसाठी फोटोशूट केलं… 50 साड्या नेसल्या… फोटो काढले तेव्हा मला तीन हजार रुपये मिळाले.’
पुढे अमृता म्हणाली, ’24 तास शूट सुरु असायचं… सकाळी 8 वाजता शूट सुरु झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत आम्ही शूट करायचो… तेव्हा मला तीन हजार रुपये मिळायचे…’, पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी साध्या दुकानात काम करणारी अमृता आज अनेकांच्या प्रेरणा स्थानी आहे.
अमृता हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अनेका मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये अमृता हिने मुख्य भूमिका साकारली आहे. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटरंग’, ‘चंद्रमुखी’, ‘राझी’ यांसारख्या एकापेक्षा एक सिनेमात अभिनेत्रीने दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. एवढंच नाहीतर, अमृता एक उत्तम डान्सर देखील आहे. तिच्या डान्सचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
