AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठीत हिरोईन होण्यासाठी गावाहून मुंबईत आली अन् तिच्या स्वप्नांचा झाला क्रूर सौदा; गिरगाव वेश्याव्यवसाय प्रकरणातील तरुणीचं दु:खद वास्तव

गिरगावमधल्या एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या हाय-प्रोफाइल वेश्या व्यवसायाचा मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच पर्दाफाश केला होता. यातून दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली असून त्यापैकी एक मराठी चित्रपटांमधील अभिनेत्री असल्याची माहिती समोर आली होती.

मराठीत हिरोईन होण्यासाठी गावाहून मुंबईत आली अन् तिच्या स्वप्नांचा झाला क्रूर सौदा; गिरगाव वेश्याव्यवसाय प्रकरणातील तरुणीचं दु:खद वास्तव
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 01, 2026 | 3:55 PM
Share

मुंबई हे स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. इथे विविध राज्यांमधून, शहरांमधून असंख्य लोक आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी येतात. मात्र प्रत्येकालाच या शहरात यश मिळतं असं नाही. काही जणांच्या नशिबी कधीच न संपणारा संघर्ष येतो, तर काही जण यात चुकीच्या मार्गाला लागून असं काही करतात, ज्यामुळे त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं. अशीच एक तरुणी ग्रामीण भागातून मुंबईत हिरोईन होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आली होती. अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिला चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळवायचं होतं. मात्र प्रत्यक्षात घडलं ते वेगळंच. गेल्या अनेक दिवसांपासून तिला काम मिळत नव्हतं. अशातच एका मेकअप आर्टिस्टने तिला देह व्यापाऱ्याच्या काळ्या विश्वात ओढलं. मुंबईतल्या गिरगाव इथून अखेर तिला अटक करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

मराठी सिनेसृष्टीत काम करणाऱ्या एका महिला मेकअप आर्टिस्टच्या माध्यमातून मुंबईतील गिरगाव परिसरात अभिनेत्रींकडून देह व्यापार करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी त्याठिकाणी धाड टाकली आणि दोन अभिनेत्रींसह दलाल म्हणून करणाऱ्या महिला मेकअप आर्टिस्टला रंगेहाथ पडकलं. गिरगाव इथल्या एका हॉटेलमध्ये हे हायप्रोफाइल देह व्यापाराचं रॅकेट सुरू होतं. या हॉटेलमध्ये मेकअप आर्टिस्ट दोन अभिनेत्रींना घेऊन येणार असल्याचं कळताच पोलीस आधीच तिथे दबा धरून बसले होते. ऐनवेळी त्यांनी संबंधित मेकअप आर्टिस्टला अटक केली आणि देह व्यापारात अडकलेल्या दोन अभिनेत्रींची सुटका केली.

मराठी चित्रपटसृष्टीत काम करत असलेल्या या मेकअप आर्टिस्टचा अनेक अभिनेत्रींशी संपर्क होता. काम आणि पैशांसाठी हतबल असलेल्यांना ती जाळ्यात ओढायची. अशीच एक मराठी चित्रपटांमधील मुख्य अभिनेत्री ग्रामीण भागातून मुंबईत आली होती. या अभिनेत्रीसह आणखी एका बंगाली मॉडेलचा तिने प्रत्येक एक लाख रुपयांनी सौदा केला होता. या दोघींसाठी ती ग्राहकाकडून दोन लाख रुपये घेणार होती, मात्र पोलिसांनी ऐनवेळी धाड टाकून तिला अटक केली. या प्रकरणामुळे अभिनय क्षेत्रातील काळं वास्तव पुन्हा एकदा उघडकीस आलं आहे.

पोलिसांच्या तपासात या देह व्यापाराच्या आर्थिक व्यवहारांबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला मेकअप आर्टिस्टने एका श्रीमंत ग्राहकांसोबत दोन अभिनेत्रींचा सौदा केला होता. या करारानुसार, एका रात्रीसाठी एका अभिनेत्रीला एक लाख रुपये असा दर ठरवण्यात आला होता. ग्राहकांकडून ती मोठी रक्कम घेऊन त्यातून ती स्वत:चं कमिशन वजा करून महिलांना ती देह व्यापाराच्या जाळ्यात अडकवणार होती.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!