AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girija Oak : ‘त्यांचीही बायको – मुलगी आहे, म्हणून…’, आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर गिरिजा ओकचं वक्तव्य

Girija Oak : घटस्फोटानंतर गिरीश ओक यांनी थाटला दुसरा संसार, वडिलांसोबत असलेल्या नात्यावर गिरिजा म्हणते, 'आम्ही फार संपर्कात नाही पण...', नुकता झालेल्या एका मुलाखतीत गिरिजा हिने वडिलांसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

Girija Oak : 'त्यांचीही बायको - मुलगी आहे, म्हणून...', आई - वडिलांच्या घटस्फोटानंतर गिरिजा ओकचं वक्तव्य
गिरिश ओक - गिरिजा ओक
| Updated on: Jun 30, 2026 | 8:44 AM
Share

Girija Oak : निळ्या साडीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक चांगलीच चर्चेत आली. सध्या गिरिजा ‘भारत भाग्य विधाता’ सिनेमामुळे चर्चेत आहे. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने वडिलांसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. गिरिजा मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता गिरिश ओक यांची मुलगी आहे. गिरिश ओक आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा गिरिजा लहान असतानाच घटस्फोट झाला. त्यानंत गिरिश ओक यांनी दुसरा संसार थाटला. दरम्यान, मुलाखतीत गिरिजा हिने वडिलांसोबत आता नातं कसं आहे, याबद्दल भाष्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गिरिजा ओक हिची चर्चा सुरु आहे.

वडील गिरिश ओ यांच्याबद्दल बोलताना गिरिजा म्हणाली, ‘मी लहान असताना सर्वात मोठी फॅन बाबांची होते… त्यांची जवळपास सगळी नाटकं मी पाहिली आहे. अगदी पाठ होईपर्यंत त्यांची नाटकं मी पाहिली आहेत. त्यांच्या प्रत्येक नाटकाचे 20 – 20 प्रयोग मी पाहिले असतील. बाबांची नाटकं आणि बाबांचं काम पाहत मी मोठी झाले. पण कालांतराने माझे आई – वडील विभक्त झाले. त्यानंतर मी माझ्या आईसोबत राहू लागले. त्यामुळे बाबांसोबत माझा फारसा संपर्क आला नाही. पण एक कलाकार म्हणून माझ्या मनात त्यांच्याविषयी फार आदर आहे…’

गिरिजा पुढे म्हणाली, ‘आतापर्यंत त्यांची जे काही काम केलं आहे ते स्वकष्टाने केलं आहे. त्याबद्दल मला आदर आणि अभिमान आहे… आता आम्ही फार संपर्कात नाही. कारण मी माझ्या आईकडे राहायला लागले… त्यांचं देखील कुटुंब आहे. बायको आहे, मुलगी आहे.. सगळं उत्तम आहे. कुटुंब एकत्र आली की, भेटणं बोलणं होतं. पण असं रोजचं बोलणं होत नाही. मला माझं आयुष्य आहे. त्यांना त्यांचं आयु्ष्य आहे…’

‘आजही लोकं मला विचारतात, ‘तुम्ही गिरिश ओक यांची मुलगी ना?’ मला असं कोणी जेव्हा मला विचारतं, तेव्हा मला खूप आनंद होतो. एवढंच नाही तर, तुम्ही तुमच्या वडिलांसारखं काम करता… हे ऐकल्यानंतर तर, आणखी छान वाटतं… असं गिरिजा ओक हिने नुकताच झालेल्या मुलाखतीत सांगितलं.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा