मृणाल दुसानिसने दिली ‘गुड न्यूज’; चिमुकल्या पाहुणीचं नाव माहित आहे का?

अभिनेत्री मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) चाहत्यांना गोड बातमी (Good News) दिली आहे. मृणालच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं असून त्याचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 24 मार्च रोजी तिने मुलीला जन्म दिला.

मृणाल दुसानिसने दिली 'गुड न्यूज'; चिमुकल्या पाहुणीचं नाव माहित आहे का?
Mrunal Dusanis
Image Credit source: Facebook
स्वाती वेमूल

|

Apr 01, 2022 | 12:32 PM

अभिनेत्री मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) चाहत्यांना गोड बातमी (Good News) दिली आहे. मृणालच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं असून तिचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 24 मार्च रोजी तिने मुलीला जन्म दिला. ‘डॅडींची छोटी मुलगी आणि मम्माचं संपूर्ण विश्व.. आमची चिमुकली परी’, असं कॅप्शन मृणालने या फोटोला दिलं आहे. मृणालने फेब्रुवारी महिन्यात इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांना दिली होती. तिने लहान बाळाचे कपडे आणि खेळणी यांचा फोटो शेअर केला होता. ‘आम्ही आमच्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी सज्ज झालो आहोत.’, असं कॅप्शन तिने फोटोला दिलं होतं. “आम्ही ठरवलंय की आता जास्त वेळ झोपायचं नाही. घरासाठी वेळ द्यायचा. घर स्वच्छ ठेवण्यावर भर द्यायचा. कारण खूप आनंद घेऊन चिमुकली पावलं आता घरभर फिरणार आहेत.”, असंही ती या पोस्टमध्ये म्हणाली होती. (Marathi Actress)

मृणालने तिच्या मुलीचं नावंसुद्धा फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. ‘नूर्वी’ असं तिच्या मुलीचं नाव आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मृणालला ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. 2016 मध्ये तिने नीरज मोरेशी लग्न केलं. नीरज हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. लग्नानंतर ती अमेरिकेत वास्तव्यास आहे.

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकांमध्येही मृणालने भूमिका साकारल्या आहेत. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका अर्ध्यातच सोडून तिने काही काळासाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती पुन्हा एकदा ‘हे मन बावरे’ मालिकेत झळकली.

हेही वाचा:

Mumbai: निवेदिता सराफ यांच्यासमोर ड्राइव्हरला बेदम मारहाण

अमिताभ बच्चन यांनी हृषिकेशमध्ये केली गंगा आरती; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें