AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजसाहेब, तुमच्यासारखा साचा बनवणं देवाने कधीच सोडून दिलंय, तेजस्विनी पंडितच्या शुभेच्छा

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने फेसबुकवर एक पोस्ट केली आहे.

राजसाहेब, तुमच्यासारखा साचा बनवणं देवाने कधीच सोडून दिलंय, तेजस्विनी पंडितच्या शुभेच्छा
raj thackeray
| Updated on: Jun 14, 2025 | 9:14 PM
Share

Raj Thackeray Birthday : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस हा मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी एक उत्सव असतो. राज ठाकरेंच्या वाढदिवशी म्हणजेच 14 जून रोजी मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जमा होतात. राज ठाकरे यांना सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार आवर्जुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेदेखील राज ठाकरेंना फेसबुकच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तेजस्विनी पंडित नेमकं काय म्हणाली?

तेजस्विनी पंडितने तिच्या फेसबुक खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने राज ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले असून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे देवाने राज ठाकरे यांच्यासारखा माणूस घडवण्याचे कधीच सोडून दिले आहे, असं म्हणत तिने राज ठकरेंना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली आहे.

तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं केंव्हाच सोडून दिलं आहे

‘मराठी अस्मितेच्या पाठीराख्याला, मराठी भाषेच्या पोशिंद्याला, महाराष्ट्राच्या भूमीपुत्राला आणि या सगळ्यापलीकडे एका मनस्वी ,सच्च्या, अनोख्या व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा,’ असं तेजस्विनी पंडित आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाली आहे. तसेचत ‘राजसाहेब, खरंच, तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं केंव्हाच सोडून दिलं आहे. देव तुम्हाला दीर्घायु देवो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो, हसत रहा, असंही तेजस्विनी राज ठाकरेंना उद्देशून म्हणाली आहे.

मुंबईच्या बाहेर जाणार, कृपया शिवतीर्थवर येऊ नये

दरम्यान राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या तीन दिवस अगोदर मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवतीर्थ बंगल्यावर मला शुभेच्छा द्यायला येऊ नये, असे आवाहन केले होते. तसेच आपण लवकरच भेटुया असेही त्यांनी आश्वासन दिले होते. येत्या 14 जून 2025 ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणं शक्य नाही. कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबईबाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजरा का करणार नाहीये ? काही विशेष कारण आहे का ? इत्यादी… पण मनापासून सांगतोय की खरंतर असं कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या 14 जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.