AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बडाभाव अन् वडापाव…; अशोक सराफ- सचिन पिळगांवकरांनी लुटला ‘कीर्ती’च्या वडापावचा आनंद

Actor Ashok Saraf and Sachin Pilgaonkar Viral Video : अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी 'कीर्ती'च्या वडापावचा आनंद लुटला. वडापाव खात असतानाचा अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहा.......

बडाभाव अन् वडापाव...; अशोक सराफ- सचिन पिळगांवकरांनी लुटला 'कीर्ती'च्या वडापावचा आनंद
अशोक सराफ आणि सचिन पिळगावकरImage Credit source: tv9
| Updated on: Jul 24, 2024 | 7:21 PM
Share

मुंबईतील प्रसिद्ध वडापावच्या यादीत कीर्ती कॉलेजजवळच्या अशोक वडापावचा नंबर वरचा आहे. हा वडापाव खाण्यासाठी मुंबईकर गर्दी करतात. याच प्रसिद्ध वडापावचा अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी आनंद लुटला. अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांनी कीर्ती कॉलेजजवळचा वडापाव खाल्ला. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर एकत्र प्रवास करत असताना त्यांनी वडापावचा आनंद घेतला.

व्हीडिओ व्हायरल

मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेत ‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. हा कार्यक्रम झाल्यानंतर अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांनी एकत्र प्रवास केला. यावेळी या दोघांनी कीर्ती कॉलेजजवळच्या अशोक वडापावचा आनंद घेतला. वडापाव खात असताना “माझ्या बाजूला अशोक अन् हातात अशोकचा वडापाव… हा बडाभाव आणि हा वडापाव”, असं सचिन पिळगांवकर या व्हीडिओत म्हणताना दिसत आहेत. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

‘नवरा माझा नवसाचा 2’ कधी रिलीज होणार?

सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल 19 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट येत्या 20 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. एसटी बसच्या प्रवासात ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे.

‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक टीजर देखील सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट अल्पावधीतच कमालीचा हिट झाला होता. पहिल्या भागातला चमत्कारिक नवस फेडताना उडालेली तारांबळ अतिशय मनोरंजक ठरली होती. त्यामुळे आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ मध्ये नक्की काय घडतं, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.