AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा खळखळून हसायला सज्ज व्हा…’या’ दिवशी ‘नवरा माझा नवसाचा 2’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Navra Majha Navsacha 2 Release Date : 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली... अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव या कलाकारांच्या 'नवरा माझा नवसाचा 2'मध्ये प्रमुख भूमिका आहेत. वाचा...

पुन्हा खळखळून हसायला सज्ज व्हा...'या' दिवशी 'नवरा माझा नवसाचा 2' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
'नवरा माझा नवसाचा 2' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीरImage Credit source: tv9
| Updated on: Jul 20, 2024 | 4:15 PM
Share

‘नवरा माझा नवसाचा’ हा सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन… हा सिनेमा आजही टीव्हीवर लागला की घरात हास्य लहरी उमटतात. आता पुन्हा एकदा खळखळून हसायला तयार व्हा… कारण ‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल 19 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट येत्या 20 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. एस टी बस प्रवासात ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे.

‘नवरा माझा नवसाचा 2’ कधी प्रदर्शित होणार?

‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमाच्या टीमने नुकतंच मुंबईतील श्री. सिद्धिविनायक मंदिरात या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. येत्या 20 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित अशोक सराफ उपस्थित होते. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे. तर संवाद संतोष पवार यांनी लिहिलेले आहेत. चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक टीजर देखील सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

 सिनेमात कोण-कोण कलाकार?

चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याशिवाय ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसी झाले आहेत.

‘नवरा माझा नवसाचा ‘ हा चित्रपट अल्पावधीतच कमालीचा हिट झाला होता. पहिल्या भागातला चमत्कारिक नवस फेडताना उडालेली तारांबळ अतिशय मनोरंजक ठरली होती. त्यामुळे आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ मध्ये नक्की काय घडतं ज्यामुळे रेल्वे प्रवास करावा लागतो यासाठी रसिक प्रेक्षकांना अजून थोडी वाट पहायला लागणार आहे.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.