अप्पू अन् दगडू पहिल्यांदाच एकत्र; प्रथमेश-ज्ञानदाचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Actor Prathmesh Parab and Dnyanada Ramtirthkar New Movie Mumbai Local : अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. वाचा सविस्तर...

अप्पू अन् दगडू पहिल्यांदाच एकत्र; प्रथमेश-ज्ञानदाचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 3:54 PM

ठिपक्यांची रांगोळीमधील अप्पू अर्थात अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आणि टाईमपास सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परब हे एका सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘मुंबई लोकल’ असं सिनेमाचं नाव आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये घडणारी एक मनोरंजक कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. मुंबई लोकल या चित्रपटात प्रथमेश आणि ज्ञानदाची जोडी दिसणार आहे. या नव्या जोडीविषयी चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या टीमने सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन या चित्रपटाची घोषणा केली.

टाइमपास, टकाटक, बालक पालक अशा अनेक चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबनं आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. विनोदी भूमिकांसह त्याच्यातील गंभीर अभिनेत्याचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहे. त्यामुळे प्रथमेश परब हा नव्या पिढीतला लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. टाइमपासमधलं दगडू हे त्याचं पात्र प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

ज्ञानदा रामतीर्थकरनं प्रामुख्यानं टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ज्ञानदाच्या सख्या रे, जिंदगी नॉट आऊट, शतदा प्रेम करावे, ठिपक्यांची रांगोळी अशा मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय धुरळासारखे काही चित्रपटही तिनं केले आहेत. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील अप्पू हे तिचं पात्र प्रचंड लोकप्रिय ठरलं.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी यांनी “मुंबई लोकल” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्राची राऊत, सचिन अगरवाल सहनिर्माते असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित करणार आहेत. या चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे आदी कलाकारही आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहेत.

चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी करणार असून संकलन स्वप्निल जाधव यांचे आहे. क्रिएटिव्ह प्रोडूसर आणि सह दिग्दर्शक विनोद शिंदे असून कलादिग्दर्शक म्हणून सुमित पाटील पाहणार आहेत. कार्यकारी निर्माता नीलेश गुंडाळे तर रश्मी राठी कपडेपट पाहणार आहेत. संगीतकार म्हणून देव आशिष आणि हर्षवर्धन वावरे काम पाहत आहेत.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.