AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी मनोरंजन विश्वातल्या ‘या’ प्रसिद्ध जोडीला कोरोनाची लागण, घरातच झालेयत सेल्फ क्वारंटाईन

नुकतच उमेश आणि प्रियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट पाहून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दोघांची कोव्हिड-19 चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मराठी मनोरंजन विश्वातल्या ‘या’ प्रसिद्ध जोडीला कोरोनाची लागण, घरातच झालेयत सेल्फ क्वारंटाईन
उमेश कामत आणि प्रिया बापट
| Updated on: Mar 17, 2021 | 4:15 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असणारी मराठी मनोरंजन विश्वातली प्रसिद्ध जोडी अर्थात अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) आणि अभिनेत्री प्रिया बापट (priya Bapat) यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. या जोडीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः उमेश कामात याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिती या संदर्भातील माहिती चाहत्यांना दिली आहे (actor priya bapat and umesh kamat tested corona positive).

उमेश आणि प्रिया सध्या त्यांच्या आगामी वेब सीरीजच्या चित्रीकरणात व्यस्त होते. तर, त्यांच्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे प्रयोग देखील नुकतेच सुरु झाले होते.

उमेश कामतची पोस्ट

नुकतच उमेश आणि प्रियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दोघांची कोव्हिड-19 चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. उमेश या पोस्टमध्ये लिहीतो की, ‘दुर्दैवाने माझी आणि प्रियाची कोरोन चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सध्या आम्ही घरात सेल्फ क्वारंटाईन आहोत. आवश्यक ती औषधे घेत आहोत आणि सावधगिरी देखील बाळगत आहोत. सगळ्या नियमांचेही पालन करत आहोत. मागील आठवड्यात जे कुणीही आमच्या संपर्कात आले असतील, त्यांनी देखील कोव्हिड चाचणी करुन घ्यावी किंवा स्वत:ला आयसोलेट करावे.’ (actor priya bapat and umesh kamat tested corona positive)

उमेश आणि प्रिया सध्या घरातच सेल्फ क्वारंटाईन झाले असून, त्यांनी त्यांच्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उमेश कामत आणि प्रियाची ही बातमी कळताच सगळे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. प्रिया आणि उमेशने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय वेब सीरीजच्या दुसर्‍या सीझनसाठी एकत्र शूटिंग सुरू केली होती. याशिवाय ते ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या मराठी नाटकासाठी टूर करण्यात व्यस्त होते. या जोडप्याने 2011 मध्ये लग्न गाठ बांधली होती आणि त्यांनी ‘टाईम प्लीज’ या मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते.

उमेशचं वेब विश्वात पदार्पण

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

(actor priya bapat and umesh kamat tested corona positive)

‘आणि काय हवं?…’ या वेब सीरीजच्या माध्यमातून उमेशने पहिल्यांदाच वेब विश्वात पदार्पण केले होते. तर, प्रिया बापटची ही दुसरी सीरीज होती. ‘आणि काय हवं?…’ या वेब सीरीजमध्ये प्रियाने ‘जुई’ची, तर उमेशने ‘साकेत’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. लग्नानंतर आयुष्यात होणारे काही बदल, पती-पत्नी या नात्यामध्ये असलेलं प्रेम, मैत्रीचं नात यावर ही सीरीज भाष्य करते. लग्न झालेल्या शहरी कपल्समध्ये अगदी घरगुती स्वरूपाचे गमतीशीर संवाद कसे होतील, त्यांच्या आयुष्यातल्या गमतीजमती या सीरीजच्या आधीच्या पर्वामध्ये दाखवण्यात आल्या होत्या. खऱ्या आयुष्यातले त्यांचे नवरा-बायकोचे नाते, नात्यातली सहजता या सीरीजमध्ये दिसणार आहे.

उमेश आणि प्रियाने ‘टाईम प्लीज’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यालाही आता सात-आठ वर्ष झाली आहेत. त्यानंतर दोघेही एकत्र आले नव्हते. ‘दादा एक गुडन्यूज आहे’ हे नाटक प्रियाने निर्मित केले असून, उमेशची त्यात महत्त्वाची भूमिका आहे.

(actor priya bapat and umesh kamat tested corona positive)

हेही वाचा :

‘आणि काय हवं…?’, प्रिया बापट-उमेश कामतकडे चाहत्यांसाठी मोठी ‘गुड न्यूज’!

प्रसिद्ध मराठी अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात, ‘या’ खास व्यक्तीशी बांधली लग्नगाठ!

Rang Maza Vegla | ऑन स्क्रीन वैर, मात्र ऑफ स्क्रीनवर धमाल, पाहा डॉक्टर कार्तिक आणि श्वेताचा डान्स!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.