Bhirkit: ‘डोळ्यावर गॉगल लावा’ ठसकेदार लावणी प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी आहे, कलाकारही तितकेच ताकदीचे आहेत. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद या कलाकारांच्या भूमिका आहेत.

Bhirkit: 'डोळ्यावर गॉगल लावा' ठसकेदार लावणी प्रेक्षकांच्या भेटीला
Bhirkit songImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 8:15 AM

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात ‘भिरकीट’ (Bhirkit) नावाचं वादळ घोंगावत आहे. ‘भिरकीट’च्या ट्रेलरला व गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता आणखी एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्या गाण्याचे बोल ‘डोळ्यावर गॉगल लावा’ असे आहे. हे गाणे लावणी (Lavni) पद्धतीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्यातून प्रेक्षकांमध्ये चांगलाच हशा पिकणार आहे. ‘डोळ्यावर गॉगल लावा’ या गाण्याला उर्मिला धनगर व मंगेश कांगणे यांचा ठसकेदार आवाज मिळाला असून मंगेश कांगणे यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. 17 जून रोजी ‘भिरकीट’ हा चित्रपट (Marathi Movie) प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात, “भिरकीट चित्रपटात प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी मिळणार आहे. ‘डोळ्यावर गॉगल लावा’ हे गाणे लावणी पद्धतीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात विनोद आणि कौटुंबिक संबंधाबरोबरच ठसकेदार लावणी ही पहायला मिळणार आहे. नक्कीच हे गाणं प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.”

पहा गाणं-

हे सुद्धा वाचा

आजच्या काळात पैसा, प्रसिद्धी एकंदरच भौतिक सुखाचे भिरकीट प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागले आहे. यात एक अशी व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे, जी स्वतःच ‘भिरकीट’ आहे. त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना घडते आणि तो त्यात कसा अडकला जातो, हे ‘भिरकीट’मध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी आहे, कलाकारही तितकेच ताकदीचे आहेत. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद या कलाकारांच्या भूमिका आहेत.

क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत व अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ चित्रपटाची निर्मिती सुरेश जामतराज ओसवाल व भाग्यवंती ओसवाल यांनी केली असून पटकथा व संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण मीर व संकलन फैजल महाडिक यांनी केले आहे.शैल व प्रितेश या जोडीचे धमाल संगीत लाभलेल्या या चित्रपटाच्या वितरणाची धुरा युएफओने सांभाळली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.