AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhaya Kadam: ‘येरे येरे पावसा’मध्ये जुबैदाच्या भूमिकेत छाया कदम

पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या गावातील जुबैदा आपल्या छोटया घरात अडीअडचणींचा सामना करत परिस्थितीला तोंड देतेय. मात्र तिचा आत्मविश्वास तसूभरही ढळलेला नाही. या खडतर परिस्थितीशी दोन हात करायला ती कायम सज्ज असते.

Chhaya Kadam: 'येरे येरे पावसा'मध्ये जुबैदाच्या भूमिकेत छाया कदम
Chhaya KadamImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 26, 2022 | 5:46 PM
Share

‘झुंड’, ‘कौन प्रवीण तांबे’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘नाय वरणभात लोन्चा’, ‘सोयरीक’ यांसारख्या अलीकडच्या मराठी, हिंदी चित्रपटांमधल्या दमदार भूमिकांमुळे अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) चर्चेत आहेत. विविधारंगी व्यक्तिरेखा आणि त्यातला सशक्त अभिनय यामुळे कोणत्याही भूमिकेत त्या अगदी फिट्ट बसतात. नुकताच येऊ घातलेला येरे येरे पावसा (Ye Re Ye Re Pavasa) हा मराठी चित्रपटही (Marathi Movie) त्याला अपवाद नाही. त्यातील जुबैदा ही व्यक्तिरेखा त्यांनी तेवढ्याच ताकदीने साकारली आहे. पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या गावातील जुबैदा आपल्या छोटया घरात अडीअडचणींचा सामना करत परिस्थितीला तोंड देतेय. मात्र तिचा आत्मविश्वास तसूभरही ढळलेला नाही. या खडतर परिस्थितीशी दोन हात करायला ती कायम सज्ज असते. 17 जूनला येरे येरे पावसा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना त्या सांगतात, “मी खूप काही ठरवून असं करत नाही. कथेमध्ये, भूमिकेत काही वेगळेपण असेल, तर ते करायला आवडतं. येरे येरे पावसा या चित्रपटाचा विषय मला भावला. काही चित्रपटांचा आशय प्रेक्षकांना जगण्याचं लढण्याचं बळ देत असतो. येरे येरे पावसा हा चित्रपट याच पठडीतला आहे. लहान मुलांच्या माध्यमातून छोटीशी वाटणारी गोष्ट खूप रंजकपणे सांगण्यात आली आहे. माझ्यासोबत अभिनेते मिलिंद शिंदे मोहम्मद या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. आमच्या दोघांची जोडी यात आहे.”

‘येरे येरे पावसा’ या चित्रपटात छाया कदम यांच्यासोबत मिलिंद शिंदे, संदेश जाधव, विनायक पोतदार, आर्या आढाव, चिन्मयी साळवी, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव जेऊघाले पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ, प्रज्ञा गोपाले यांच्या भूमिका आहेत.

‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांनी ‘येरे येरे पावसा’ चित्रपटाची प्रस्तुती केली असून सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड झाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.