राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘येरे येरे पावसा’ प्रदर्शनासाठी सज्ज, 17 जूनपासून जवळच्या चित्रपटगृहात

अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मोहोर उमटविणारा हा चित्रपट 17 जूनला तुमच्या भेटीला येतोय. 14 देशातल्या 31 चित्रपट महोत्सवांमध्ये अधिकृत निवड झालेल्या या चित्रपटाने 22 नामांकन आणि 16 पुरस्कार आतापर्यंत पटकावले आहेत.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘येरे येरे पावसा’ प्रदर्शनासाठी सज्ज, 17 जूनपासून जवळच्या चित्रपटगृहात
‘येरे येरे पावसा’- मराठी सिनेमाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 8:10 AM

मुंबई : पाऊस(Rain) कधी धुक्यांच्या कुशीत कुंद होऊन बरसणारा तर कधी धो-धो कोसळणारा…कधी हवाहवासा वाटणारा तर कधी जीव नकोसा करणारा … त्याची प्रतिक्षा मात्र सगळ्यांना असते. एका छोटयाशा खेडेगावातल्या चिमुकल्यांनाही या पावसाची अशीच प्रतिक्षा आहे. त्यासाठी ते आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांच्या आशा निराशेच्या खेळाची रंगतदार गोष्ट म्हणजे ‘येरे येरे पावसा’ (Yere Yere Pawasa Movie) हा आगामी मराठी चित्रपट. ‘जीफोनी’, ‘हॉलीवूड नॉर्थ फिल्म’, ‘टोकियो इंडी फिल्म’ या आणि अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मोहोर उमटविणारा हा चित्रपट 17 जूनला तुमच्या भेटीला येतोय. 14 देशातल्या 31 चित्रपट महोत्सवांमध्ये अधिकृत निवड झालेल्या या चित्रपटाने 22 नामांकन आणि 16 पुरस्कार आतापर्यंत पटकावले आहेत. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे.

‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.

छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, चिन्मयी साळवी, विनायक पोतदार, आर्या आढाव, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

संबंधित बातम्या

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नात असेल कडक सुरक्षाव्यवस्था; बोलावण्यात आले 200 बाऊंसर्स

रुपाली चाकणकर यांच्या मुलाचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

Aai Kuthe Kay Karte: ‘त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला’; सेटवरील खास व्यक्तीसाठी मिलिंद गवळी यांची पोस्ट

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.