AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmaveer : आनंद दिघेंच्या मृत्यूचा प्रसंग पाहणं उद्धव ठाकरेंनी टाळलं! सिनेमा अर्धवट सोडून थिएटरबाहेर

Dharmaveer Marathi Movie : आनंद दिघे यांच्या मृत्यूचा प्रसंग पाहणं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाळलंय.

Dharmaveer : आनंद दिघेंच्या मृत्यूचा प्रसंग पाहणं उद्धव ठाकरेंनी टाळलं! सिनेमा अर्धवट सोडून थिएटरबाहेर
आनंद दिघेंच्या भूमिकेत प्रसाद ओक आणि उद्धव ठाकरे...Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 16, 2022 | 7:04 AM
Share

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि ठाण्यातील एक आघाडीचं नाव असलेले आनंद दिघे (Aanand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत असलेला धर्मवीर चित्रपट (Dharmaveer Marathi Movie) रिलीज झाला. त्यानंतर आता चित्रपटाबाबत एक रंजक किस्सा मुंबईत पाहायला मिळाला. हा चित्रपट पाहायला गेलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चित्रपटाचा शेवट न पाहताच चित्रपटगृहातून बाहेर पडले. उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवटचा सीन न पाहता बाहेर थिएटरबाहेर आलेल्या उद्धव ठाकरेंना पाहून सगळे अवाक् झाले. त्यांनी नेमकं असं का केलं, याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. आनंद दिघे यांच्या मृत्यूचा प्रसंग पाहणं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाळलंय. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही कारण आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यतिथ झालेले बाळासाहेब पहिले आहेत. आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांवर एक आघात होता, असंही ते म्हणालेत.

धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे या चित्रपटातील आनंद दिघे यांचा अपघात आणि त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूचा प्रसंग पाहाणं मुख्यमंत्री-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाळले. उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाचा शेवट न पाहाताच चित्रपटगृह सोडले.

काय आहे तो प्रसंग?

आनंद दिघे यांच्या जीपला झालेला अपघात, त्यानंतर जखमी दिघे यांची सिंघानिया रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी आलेले तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे तसंच आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर सिंघनिया रुग्णालयात एकत्र धाव घेतलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे काही प्रसंग चित्रपटाच्या शेवटच्या 10 मिनिटांत आहेत. सिनेमाच्या शेवटी असलेले अवघ्या 10 मिनिटांचा प्रसंग अंगावर काटा आणणार आहे.

आणि उद्धव ठाकरे बाहेर आले..

मिलिंद नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेऊन आनंद दिघे ठाण्यात परततात. चित्रपटातील हा प्रसंग संपतातच उद्धव ठाकरे चित्रपटगृहातून निघाले. नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स मल्टिपेक्स चित्रपटगृहात उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय तसंच शिवसेना आमदार- नेत्यांसाठी विशेष स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आले होते.

या स्क्रिनिंगला उद्धव ठाकरे यांच्यासह यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसंच शिवसेनेचे मंत्री-नेते एकनाथ शिंदे, पक्षाची काही वरिष्ठ नेते, काही आमदार-खासदारही उपस्थित होते. यावेळी चित्रपटातील कलावंत, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ अशी टीमही उपस्थित होती.

मोठ्या पडद्यावर साकारण्यात आलेल्या आनंद दिघे यांच्या राजकीय जीवनपटाला उपस्थितांनी दाद दिली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी चित्रपटातील तो शेवटचा प्रसंग पाहाणे टाळले. रश्मी ठाकरे आणि उपस्थित नेते-आमदारांनी मात्र संपूर्ण चित्रपट पाहिला.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार