AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनू निगमला पहिला ब्रेक देणाऱ्या मराठी गायकाचे निधन, संगीत विश्वावर शोककळा

गायक सोनू निगमने आपल्या गाण्याने देशातील प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अनेक भाषांमधून सोनू निगमने पार्श्वगायन केलं आहे. (did you know which is sonu nigam's first song?)

सोनू निगमला पहिला ब्रेक देणाऱ्या मराठी गायकाचे निधन, संगीत विश्वावर शोककळा
sonu nigam
| Edited By: | Updated on: Feb 25, 2025 | 8:38 PM
Share

मुंबई: प्रसिद्ध गायक आणि गीतकार प्रभाकर पोखरीकर यांचे निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. प्रभाकर पोखरीकर यांनी आतापर्यंत अनेक नवीन गायकांना संधी दिली होती. या नवोदित गायकांच्या यादीत प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गायक सोनू निगमचाही समावेश आहे. सोनू निगम गायक म्हणून संघर्ष करत असताना त्याला गायक आणि गीतकार प्रभाकर पोखरीकर यांनी संधी दिली होती. त्याने पहिलं गीत गायलं ते मराठीच होतं. विशेष म्हणजे ते गाणं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील होतं. कोणतं होतं हे गाणं? सोनू निगमला ब्रेक देणारा हा गायक कोण? त्याचाच हा किस्सा. (did you know which is sonu nigam’s first song?)

‘जीवाला जीवाचं दान’ आणि सोनू निगम

प्रसिद्ध गायक आणि गीतकार प्रभाकर पोखरीकर यांनी खेड्यापाड्यातील अनेक नव्या गायकांना गायनाची संधी दिली होती. त्यांनीच गायन क्षेत्रात संघर्ष करणाऱ्या सोनू निगमलाही पहिला ब्रेक दिला. पोखरीकर यांनी त्यांच्या ‘जीवाला जीवाचं दान’ या कॅसेटमध्ये सोनू निगमला पहिली संधी दिली. या कॅसेटमध्ये एकूण दहा गाणी आहेत. ही सर्व गाणी प्रभाकर पोखरीकर यांनी लिहिली असून त्यातील नऊ गाणी सोनू निगम यांनी गायली आहेत. ही सर्व गाणी त्याकाळी प्रचंड गाजली होती. त्यामुळे सोनू निगमही घराघरात पोहोचला होता. ती गाणी होती

छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्ववान होणार नाही कोणी झालाच विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही…

आणि

जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने माणसाला माणूसपण दिलं प्रेमाने

आणि

हे पाणी आणिले मी माठ भरूनी हे घोटभर जाहो पिऊनी

ही कॅसेट बाजारात आल्यानंतर तिचा प्रचंड खप झाला. या गाण्यामुळे लोकप्रियता आणि पैसाही भरपूर मिळाला. पण पैसा हातात राहिला नाही. एक तर नव्या कॅसेटच्या निर्मितीत गुंतवला किंवा सहकाऱ्यांना अडचणती मदत केली, असं पोखरीकर सांगतात. सोनू निगमसोबत आणखी एक कॅसेट काढायची आहे. सोनू निगमशी त्याबाबत बोलणं झालं आहे. जुळवाजुळव झाल्यावर नव्या कॅसेटची निर्मिती करू, असंही ते सांगतात.

काखेतून रक्त वाहत होते, पण गात होते

एखाद्या गायकाची त्याच्या गायनावरची निष्ठा काय असते हे पोखरीकरांच्या या किश्श्यातून समजून येईल. एकदा त्यांचा मुंबईतल्या माझगावच्या लव्हलेनमध्ये गायनपार्टीचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्यांच्या काखेत गाठ आलेली होती. डॉक्टरांनी त्यांना तात्काळ ऑपरेशन करण्यास सांगितले होते. मात्र कार्यक्रम असल्याने त्यांनी ऑपरेशन करण्यास नकार दिला. तशाच अवस्थेत त्यांनी लव्हलेन गाठले. गाठ दिसू नये म्हणून अंगात जॅकेट घातले आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रचंड वेदना होत होत्या… तरीही ते गात राहिले. गात असतानाच गाठ फुटले. रक्त वाहू लागले. तबलावादकाने हा प्रकार पाहिला आणि त्यांना सांगितलं. त्यांनी इशाऱ्यानेच तबलावादकाला शांत बसण्यास सांगितले. त्यानंतर चार तास कार्यक्रम चालला. कार्यक्रम संपल्यानंतर पोखरीकर उभे राहिले तेव्हा रक्ताचा ओघळ पायापर्यंत आला होता. जॅकेटचा एक भाग रक्ताने चिंब भिजून गेला होता. हा प्रकार पाहून त्यांचे सहकारीही घाबरले. परंतु पोखरीकरांनी काही झालंच नाही अशा अविर्भावात टॅक्सी करायला सांगितली आणि थेट नायर रुग्णालयात जाऊन अॅडमिट झाले. हा किस्सा आजही ते आवर्जुन सांगत असतात. (did you know which is sonu nigam’s first song?)

पुन्हा दुसरा जन्म

पोखरीकर एकदा नव्हे तर दोनदा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. 26 जुलैच्या मुसळधार पावसात पोखरीकर भिजले होते. त्यामुळे ते प्रचंड आजारी पडले. अविवाहित असलेल्या पोखरीकरांची जगण्याची शाश्वती नव्हती एवढी प्रकृती खालावली होती. यावेळी त्यांच्या मदतीला बौद्ध भिक्खू धावून आले. भदंत विररत्न, भदंत काश्प, भदंत सदातिस्स, भदंत संघरत्न, भदंत अश्वजीत, भदंत सुमंगल आणि विजय शिंदे यांनी त्यांची प्रचंड सुश्रुषा केली. त्यामुळे पोखरीकर मरणाच्या दारातून परत आले. (साभार, आंबेडकरी कलावंत) (did you know which is sonu nigam’s first song?)

संबंधित बातम्या:

पहिलं गाणं रेकॉर्ड झालं अन् प्रल्हाद शिंदेंना सोन्याची अंगठी दिली; मधुकर घुसळेंचं ‘ते’ लोकप्रिय गाणं कोणतं?

गर्दीनं डोकं फिरलं अन् ‘डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया…’ सूचलं; वाचा अफलातून किस्सा!

‘कारभारी दमानं… होऊ द्या दमानं’चा कारभारी कोण माहीत आहे का?; वाचा, न ऐकलेला किस्सा (did you know which is sonu nigam’s first song?)

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.