Ananya Movie : अनन्य सिनेमा-अनन्य भेट! चाहत्याकडून हृता दुर्गुळेला मिळालं खास गिफ्ट…

Hruta Durgule : हृताला एक अंगठी गिफ्ट मिळाली आहे. पण ही अंगठी खास आहे. 'अनन्या' असं या अंगठीवर लिहिलेलं आहे.

Ananya Movie : अनन्य सिनेमा-अनन्य भेट! चाहत्याकडून हृता दुर्गुळेला मिळालं खास गिफ्ट...
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 8:45 AM

मुंबई : रंगभूमी, मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. ‘अनन्या’ चित्रपटाच्या (Ananya Movie) माध्यमातून हृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर हृताने (Hruta Durgule) अल्पावधीतच आपला फॅन फॉलोअर्स वाढवला. हृताचे असंख्य चाहते असून तिची एक झलक पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. बरेच चाहते तिच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही संवाद साधतात आणि हृताही आपल्या चाहत्यांना अगदी आनंदाने प्रतिसाद देते. हृताच्या अशाच एका चाहत्याने तिला एक अनोखी भेट दिली आहे. या चाहत्याने हृताला ‘अनन्या’ नावाची एक सुंदर अंगठी भेट देऊन तिला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अनन्य अंगठी!

हृता दुर्गुळे अनेकांच्या दिलाची धडकन आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. तिचे फॅन नेहमी तिच्यासाठी काही खास गोष्टी करत असतात. आताही त्यांनी तिच्या सिनेमाला आणि हृताला शुभेच्छा देण्यासाठी अनोखं गिफ्ट दिलं आहे. तिला एक अंगठी गिफ्ट मिळाली आहे. पण ही अंगठी खास आहे. अनन्या असं या अंगठीवर लिहिलेलं आहे. तिने यावेळी आपल्याला आनंद झाल्याचं म्हटलंय.

हृताला मिळालेल्या या सुंदर भेटीबद्दल हृता म्हणते, “चाहत्यांचे असे प्रेम बघून खरेच खूप भारावून जायला होते. आपल्यावर, आपल्या कामावर कोणी इतके प्रेम करते, ही भावनाच खूप आनंद देणारी आहे आणि याच प्रेमामुळे आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची ऊर्जा मिळते. ‘अनन्या’मधून मी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. चित्रपट तर माझ्यासोबत आयुष्यभर असणारच आहे. मात्र ‘अनन्या’ची ही अंगठीही माझ्यासोबत कायम असेल.”

हे सुद्धा वाचा

22 जुलै ‘अनन्या’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे, तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.