Salman Ali: ‘इंडियन आयडॉल 10’चा विजेता सलमान अलीचं मराठीत प्रथमच पार्श्वगायन

"मन बांधलं बांधलं, तुझ्या नावाचं तोरण" असे गाण्याचे बोल आहेत. हे गीत गोवर्धन 'दोलताडे यांनी लिहिलं असून पी. शंकरम् यांनी संगीतबद्ध केले आहे.

Salman Ali: 'इंडियन आयडॉल 10'चा विजेता सलमान अलीचं मराठीत प्रथमच पार्श्वगायन
Salman Ali
Image Credit source: Tv9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 07, 2022 | 7:50 AM

‘इंडियन आयडल’ (Indian Idol 10) या रिॲलिटी शोमधून घराघरात पोहचलेला तसंच 10व्या सिझनचा विजेता ठरलेला गायक सलमान अली (Salman Ali) याने ‘मजनू’ (Majnu) या आगामी मराठी चित्रपटासाठी प्रथमच मराठीत पार्श्वगायन केलं आहे. “प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणाऱ्या मजनू चित्रपटासाठी गाण्याचा अनुभव खूप छान होता. जन्मभूमी हरियाणा असली तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. अनेक वर्षांपासून मुंबईत राहत असल्याने मराठी भाषेची मला गोडी लागली. मराठी चित्रपटात मला गायची इच्छा होतीच आणि ती मजनू चित्रपटामुळे माझी पूर्ण झाली,” अशा शब्दांत सलमानने आनंद व्यक्त केला.

“मन बांधलं बांधलं, तुझ्या नावाचं तोरण” असे गाण्याचे बोल आहेत. हे गीत गोवर्धन ‘दोलताडे यांनी लिहिलं असून पी. शंकरम् यांनी संगीतबद्ध केले आहे. तर अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री श्वेतलाना अहिरे यांच्यावर हे गाणं नाशिक येथील कळवण, सापुतारा अशा नयनरम्य परीसरात चित्रित झाले आहे. साऊथचे कॅमेरामन एम. बी. अलीकट्टी हे असून नृत्य दिग्दर्शक साऊथचे हाईट मंजू हे आहेत.

इन्स्टा पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by SALMAN ALI 🧿 (@officialsalman.ali)

मजून या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. या चित्रपटाविषयी ते म्हणाले, “प्रत्येकजण कॉलेजला गेल्यानंतर स्वतःला मजनू समजतो. जे लोक चित्रपट पाहतील, त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.” तर मजनू चित्रपटात रसिकांना सस्पेंस, ॲक्शन, रोमान्स तसेच लव्हस्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहेत. हा चित्रपट तरुणाईच्या हृदयाचा ठाव घेईल असे चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें