AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zimma : ‘खास महिलांची खास धमाल’, महिला दिनानिमित्त ‘झिम्मा’चा टिझर रिलीज

काही दिवसांपूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. आता या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. (Zimma: Teaser release of 'Zimma' on the occasion of 'Women's Day')

Zimma : ‘खास महिलांची खास धमाल’, महिला दिनानिमित्त ‘झिम्मा’चा टिझर रिलीज
| Updated on: Mar 08, 2021 | 11:40 AM
Share

मुंबई : काही दिवसांपूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. यात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकरही सामील असलेला पाहायला मिळाला. पोस्टरवरुन हा काही तर भन्नाट प्रकार असणार असं प्रेक्षकांना वाटलं, मात्र या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं यावरील पडदा उठला असून ‘झिम्मा’ या चित्रपटाचा टिझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठी सिनेसृष्टीतील या आघाडीच्या अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना एकाच सिनेमात पाहता येणार आहे. (Jhimma: Teaser release of ‘Jhimma’ on the occasion of ‘Women’s Day’)

वेगवेगळ्या व्यक्तीमत्वाच्या महिला येणार एकत्र

बायकांच्या मनात काय सुरु आहे, त्या कधी कशा व्यक्त होतील, याचा थांगपत्ता लागणं जरा कठीणच. अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते,  तीच आपल्याला ‘झिम्मा’मध्ये पाहायला मिळणार आहे. ‘झिम्मा’च्या टिझरवरूनच कळतंय चित्रपट किती धमाकेदार असणार आहे. इंग्लंडला फिरायला निघालेल्या या सात जणींचा प्रवास अतिशय रंजक दिसत आहे.

महिलांच्या जबाबदारीचं दर्शन घडवणारा टिझर  

इंग्लंडला जाण्यासाठी नवऱ्याची परवानगी मागणारी बाई, तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई, बॅग पॅक करताना भांडणं करणारी आई-मुलगी, घरच्यांना खोटं सांगून फिरायला निघालेली बाई, मुलीच्या काळजीपोटी इंग्लंडला जाण्यासाठी द्विधा मनस्थितीत असलेली आई, तर एकीकडे आईची परवानगी न मागता मी फिरायला जात असल्याचे ठासून सांगणारी तरुणी अशा सात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळ्या विचारांच्या, एकमेकींशी ओळख नसलेल्या या महिलांना त्यांची स्वतःशी आणि इतरांशी एक नवी ओळख करून देणारी ही सफर ठरणार असून ही सफर घडवून आणणार आहे सिद्धार्थ चांदेकर. या सहलीत सिद्धार्थ पास होतो की नापास हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र टिझर पाहून तरी ‘झिम्मा’ हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा आणि मनोरंजनाचे एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे, हे नक्की.

दिग्दर्शक हेमंत ढोमेची प्रतिक्रिया

या सिनेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे सांगतो, “हा सिनेमा बघताना या सात जणींमध्ये कुठेतरी आपणही दडलो आहोत, याची प्रत्येक स्त्रीला नक्कीच जाणीव होईल. सगळी बंधने, जबाबदाऱ्या काही काळासाठी विसरून फक्त स्वतःसाठी स्वछंदी आयुष्य जगणाऱ्या या सात अतरंगी बायकांची धमाकेदार कहाणी प्रेक्षकांना यात पाहता येणार आहे. इंद्रधनुष्याच्या सात रंगांप्रमाणे असणाऱ्या या सात स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील हे रंग अधिक गडद करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे ‘झिम्मा’चा टिझर सर्वांसमोर आणण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असूच शकत नाही.”

येत्या 23 फेब्रुवारीला ‘झिम्मा’ येणार भेटीला

‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ हा सिनेमा येत्या 23 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांचे असून चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. क्षिती जोग, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा आणि स्वाती खोपकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

संबंधित बातम्या

बबड्या कायम एक नंबर, ‘अग्गंबाई सासूबाई’च्या चित्रिकरणाचा लास्ट डे, आशुतोष पत्कीला आठवणींचा उमाळा

International Women’s Day 2021 | ‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘थलायवी’, यंदा बॉलिवूडमध्येही दिसणार ‘महिला शक्ती’!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.