हीर जन्मली त्याच गावात जन्म; आयुष्य प्रबोधनाच्या गाण्यांसाठी वेचलं; गायिका शीलादेवींची ही माहिती हवीच

पाकिस्तानात जन्म झाला... फाळणीच्या तीन वर्षानंतर भारतात आल्या... जन्माने हिंदू... मराठी भाषेशी संबंध नाही...तरीही संपूर्ण आयुष्यभर बुद्ध-आंबेडकरी गीतं गाऊन समाज प्रबोधन केलं. (know everything about veteran singer shila devi)

हीर जन्मली त्याच गावात जन्म; आयुष्य प्रबोधनाच्या गाण्यांसाठी वेचलं; गायिका शीलादेवींची ही माहिती हवीच
bhim geete
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 7:41 PM

मुंबई: पाकिस्तानात जन्म झाला… फाळणीच्या तीन वर्षानंतर भारतात आल्या… जन्माने हिंदू… मराठी भाषेशी संबंध नाही…तरीही संपूर्ण आयुष्यभर बुद्ध-आंबेडकरी गीतं गाऊन समाज प्रबोधन केलं… ही कहाणी आहे, जुन्याकाळातील गायिका शीलादेवी यांची. शीलादेवी यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी गायली आहेत. उमेदीच्या काळात गायन पार्ट्यांच्या निमित्ताने त्यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक आंबडकरी वस्त्या पिंजून काढल्या आहेत. कोण आहेत शीलादेवी? गायिका म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली? यावर टाकलेला हा प्रकाश… (know everything about veteran singer shila devi)

जन्मभूमी पाकिस्तानात, कर्मभूमी भारत

शीलादेवींना भारतात गाव असं नाही. त्या मूळच्या पंजाबच्या. परंतु, हा पंजाब भारतातील नसून पाकिस्तानातील आहे. भारत-पाकिस्तान फाळणीत पंजाबचेही दोन तुकडे झाले. त्यातील पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतातील गुंजराववाला गावात 1950 दरम्यान शीलादेवींचा जन्म झाला. हीर-रांझा या प्रेमीयुगुलाची जोडी सर्वज्ञात आहे. पाकच्या गुंजराववाला गावात हीरचा जन्म झाला. त्याच गावात शीलादेवींचा जन्म झाला. फाळणीनंतरच पाकिस्तानातील वातावरण न मानवल्याने शीलादेवींचे वडील कस्तुरीलाल गंभीर आपल्या कुटुंबासह मुंबईत आले. हे कुटुंब मुंबईतल्या सायन कोळीवाड्यात स्थायिक झालं. उदरनिर्वाहासाठी त्यांचे वडील टॅक्सी चालवायचे. आई सुमित्रादेवी घरकाम बघायच्या. नऊ भावा-बहिणींच्या या कुटुंबात शीलादेवी सर्वात थोरल्या. गरिबीमुळे शीलादेवी फक्त चौथीपर्यंत शिकल्या. पुढे वयाच्या अवघ्या तेराव्या-चौदाव्या वर्षी कॅप्टन सिंग यांच्याबरोबर त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. कॅप्टन सिंग हे सुद्धा टॅक्सी चालवायचे.

पतीचं निधन झालं अन्…

शीलादेवींच्या घरात गाणं वगैरे नव्हतं. पण त्यांना नाचगाण्याचा खूप छंद होता. त्यातही नृत्य करण्याची त्यांना भारी आवड होती. सुरुवातीच्या काळात म्हणजे 1971मध्ये त्या छंद म्हणून ऑर्केस्ट्रात गायच्या. सांताक्रुझला त्यांनी एका ऑर्केस्ट्रासाठी सहा महिने रिहर्सल केली. त्यानंतर त्याच ऑर्केस्ट्रात त्या गाऊ लागल्या. पण गाणं केवळ छंदापुरतंच होतं. एकीकडे संसारही सुरू होता. त्यांना चार मुलंही झाली होती. सुखाचे दिवस सुरू असतानाच अचानक त्यांचे पती कॅप्टन सिंग यांचं निधन झालं. त्यामुळे त्या चार मुलांसह एकाकी पडल्या. रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न उभा राहिला. त्यामुळे छंद म्हणून शिकलेलं गाणं आता त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचं साधन बनलं. पण त्यांनी ऑर्केस्ट्रा किंवा सिनेमात गाणी गाण्याऐवजी आंबेडकरी जलशांमध्ये गाणी गाणं पसंत केलं.

आयुष्याचा टर्निंग पॉइंट

त्यातच माटुंगा लेबर कॅम्पात राहणारे आंबेडकरी चळवळीतील जुनेजाणते कार्यकर्ते गोरख भिसे यांनी शीलादेवींची प्रल्हाद शिंदेंबरोबर ओळख करून दिली. प्रल्हाददादांनीच त्यांना कव्वाली आणि गायकी शिकवली. राग, ठेका, दादरा, रुपक आणि केरवा या ठेक्यांचा त्यांनी अभ्यास केला. गायकी शिकता शिकता त्या प्रल्हाद शिंदेंना कोरस देऊ लागल्या. प्रल्हाददादांच्या ‘ढोल ताशांच्या या गजरात’ आणि ‘शुभमंगल सावधान…’ या दोन गीतांमध्ये शीलादेवींनी कोरस दिला आहे. अवघ्या दोन महिन्यातच त्या कव्वाली शिकल्या.

ज्यांनी गाणं शिकवलं त्यांच्याच विरुद्ध पहिला सामना

शीलादेवींच्या आवाजाला बेस होता. शिवाय त्यांचं निरीक्षण आणि स्मरणशक्ती दांडगी होती. त्यामुळेच पंजाबी असूनही मराठी आणि इतर भाषेतील गाणी गाताना त्यांना अडचण आली नाही. कुणालाही आश्चर्य वाटावं इतक्या सहजतेने त्या इतर भाषेतील गीतं गातात. वयाच्या 24-25 व्या वर्षी त्यांनी खऱ्या अर्थाने पहिलं गाणं गायलं. त्यांनी गायलेलं पहिलं गाणं सत्यनारायणाच्या पूजेचं होतं आणि हे गाणं ‘बॉबी’ सिनेमातील एका गाण्याच्या चालीवर आधारीत होतं. विशेष म्हणजे गायिका म्हणून त्यांनी स्वतंत्र कार्यक्रम करायला सुरुवात केली असता त्यांचा पहिला सामान प्रल्हाद शिंदेंविरुद्धच होता. ज्यांनी गायला शिकवलं त्यांच्याविरोधातच त्यांनी पहिला सामना केला. त्यानंतर गोविंद म्हशीलकर, भिकाजी भंडारे, श्रावण यशवंते, किसन खरात, रंजना शिंदे आणि विठ्ठल उमप यांच्याविरुद्धही त्यांचे सामने झाले.

अन् शीलादेवी झाल्या

शीलादेवी यांच्या नावाचाही किस्सा आहे. या क्षेत्रात आल्यानंतर त्यांना शीला म्हणूनच सर्वजण ओळखायचे. पण प्रसिद्ध गीतकार, शाहीर कुंदन कांबळे यांनी ‘मनमोहक गीते’ नावाची एक पुस्तिका छापली. त्यात प्रत्येक गीताखाली गायक आणि गीतकारांची नावे होती. कांबळे यांनी शीलादेवींचं नाव छापताना ‘शीला’ ऐवजी ‘शीलादेवी’ छापलं. तेव्हापासून त्या गायिका ‘शीलादेवी’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. (साभार, आंबेडकरी कलावंत) (know everything about veteran singer shila devi)

संबंधित बातम्या:

मुलाच्या निधनाची तार आली, पण शाहिरी कार्यक्रम थांबले नाही; शाहीर इंगळेंचा हा किस्सा वाचाच!

‘जलसे’ जिवंत राहण्याची तळमळ, शाहिरीत नवे प्रयोग; वाचा, शाहीर इंगळे आणि त्यांची जडणघडण

जिजामाता महोत्सवात ‘शाहीर’ म्हणून उदय; वाचा, शाहीर डी. आर. इंगळेंची कहाणी

(know everything about veteran singer shila devi)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.