दादा कोंडकेंच्या घराची दयनीय अवस्था, प्रथमेश परबने शेअर केला फोटो

ज्या व्यक्तीने, हाऊसफुलच्या बोर्ड्सनी चित्रपटगृहाची शोभा वाढवली, आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर निर्माण केलं, खरंच, आज त्याच व्यक्तीच्या घराचं संवर्धन करणं, इतकं अवघड आहे का? असा सवाल प्रथमेश परबने विचारला आहे.

दादा कोंडकेंच्या घराची दयनीय अवस्था, प्रथमेश परबने शेअर केला फोटो
दादा कोंडकेंचं घर, प्रथमेश परबची पोस्ट


मुंबई : महाराष्ट्राला खळखळून हसवणारे दिग्गज अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या घराची दयनीय अवस्था झाल्याकडे अभिनेता प्रथमेश परब याने लक्ष वेधलं आहे. दादा कोंडकेंच्या घराबाहेरील फोटो शेअर करत प्रथमेशने फेसबुकवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील? असा सवाल प्रथमेश परबने सोशल मीडियावरुन विचारला आहे. (Marathi Actor Prathamesh Parab shares Photo of Actor Dada Kondke House)

काय आहे प्रथमेश परबची फेसबुक पोस्ट?

#सुन्न…….!!!

विस्तीर्ण निळ्या नभाखाली दिसत असलेलं, मोडकळीस आलेलं घरं दुसरं तिसरं कोणाचं नसून, आपल्या महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार दादा कोंडके यांचं आहे. हे दादांचं रहातं घरं! हा फोटो झूम करून पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की या घराची किती दयनीय अवस्था झाली आहे ते! आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील?? ज्या व्यक्तीने, हाऊसफुलच्या बोर्ड्सने चित्रपटगृहाची शोभा वाढविली, आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर निर्माण केलं, खरंच, आज त्याच व्यक्तीच्या घराचं संवर्धन करणं, इतकं अवघड आहे का????? प्रश्न अनेक आहेत!! काही सुन्न करणारे तर काही अनुत्तरित….!!
पाहा प्रथमेश परबची फेसबुक पोस्ट :

दादा कोंडके यांची कारकीर्द

अभिनेते, चित्रपट निर्माते म्हणून दादा कोंडके यांची कारकीर्द बहरली. त्यांनी मराठी वगनाट्य आणि चित्रपटांतून अभिनय केला. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या होत्या. लागोपाठ नऊ मराठी चित्रपटांच्या रौप्यम होत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ दादा कोंडके यांनी केले

संबंधित बातम्या :

दादा कोंडके म्हणाले, ‘तुमची गाणी मला द्या, हवं तेवढं मानधन घ्या’; मग काय झालं?, वाचा!

(Marathi Actor Prathamesh Parab shares Photo of Actor Dada Kondke House)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI