Marathi Movie : गंभीर विषयावर गमतीशीर चित्रपट, ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Movie : गंभीर विषयावर गमतीशीर चित्रपट, ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हलाल, नवरा माझा भोवरा, वाजवूया बँड बाजा, अहिल्या, विजेता या चित्रपटातून अभिनेत्री प्रीतम कागणे प्रेक्षकांसमोर आली आहे.(Marathi Movie: Funny film on serious subject, 'Tuz Maaz Arrange Marriage' to hit the screens soon)

VN

|

Mar 08, 2021 | 4:15 PM

मुंबई : हलाल, नवरा माझा भोवरा, वाजवूया बँड बाजा, अहिल्या, विजेता या चित्रपटातून अभिनेत्री प्रीतम कागणे प्रेक्षकांसमोर आली. तर अभिनेता बिपिन सुर्वे ‘प्रतिभा’ या चित्रपटातून आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेतून सिनेरसिकांच्या भेटीस आला. आता नव्यानं प्रीतम आणि बिपिन हे दोघं एका फ्रेश जोडीसह ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाले आहेत. चित्रपटाच्या निमित्तानं ही जोडी नव्याने मोठया पडद्यावर दिसण्यास सज्ज होत आहे.(Marathi Movie: Funny film on serious subject, ‘Tuz Maaz Arrange Marriage’ to hit the screens soon)

गंभीर विषयावर भाष्य करणारा चित्रपट

प्रीतम आणि बिपिनची ही जोडी एका वेगळ्या धाटणीच्या अशा गंभीर विषयाच्या गमतीदार कथेतून सिनेप्रेमींच्या समोर येणार आहे.

नवरा बायकोची खास जोडी

Marathi Movie

‘तुझं माझं अरेंज मॅरेज’ चित्रपटात नवरा-बायको अशी भूमिका साकारताना प्रीतम आणि बिपिन दिसणार आहेत. प्रीतम या चित्रपटात मीरा नावाच्या नवरी मुलीची तर बिपिन स्वरूप नावाच्या नवऱ्या मुलाची भूमिका साकारत आहे. ‘षष्ठीज फिल्म्स अँड एंटरटेन्मेंट’चे निर्माते अमित तिळवणकर आणि निर्माती ज्योती अमित तिळवणकर यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली.

चित्रपटात झळकणार धमाकेदार कलाकार

चित्रपटांच्या निर्मितीत पहिल्यांदाच अरेंज मॅरेज या विषयावर हा नवा कोरा चित्रपट येत असून दिग्दर्शक दिनेश विजय शिरोडे दिग्दर्शित हा सिनेमा आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून दिनेश शिरोडे पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. अभिनेत्री प्रीतम कागणे आणि अभिनेता बिपिन सुर्वे सह या चित्रपटात अभिनेता अमोल कागणे, सयाजी शिंदे, अभिजित चव्हाण तर अभिनेत्री मीरा सारंग, अभिलेशा पाटील, भाग्यश्री नलवे आदी कलाकारांच्या दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत. अतिशय धमाल आणि मनोरंजक पद्धतीने अरेंज मॅरेज हा विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. धमाल, मस्ती करण्यासाठी हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस केव्हा येतो हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.

संबंधित बातम्या

SSR Drug Case |  सुशांतला ड्रग्ज पुरवणाऱ्याला तस्कराला अटक, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता!

Kareena Kapoor | ‘महिला दिना’च्या निमित्ताने करीनाने शेअर केला ‘छोट्या नवाबा’चा फोटो, पहा कसा दिसतो तैमुरचा भाऊ…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें