AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीची सामान्य घरातील मुलगी ते अलिशान घर घेणारी अभिनेत्री ‘द सई ताम्हणकर’

Actress Sai Tamhankar New Home Video : अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नवं घर खरेदी केलं आहे. मुंबईतील तिचं हे घर प्रचंड लक्झरी आहे. सईच्या या घरातून मुंबईचा टॉप व्ह्यूव दिसतो. हे घर घेण्यामागे सईच्या भावना काय होत्या? सई नेमकं काय म्हणाली? वाचा सविस्तर...

सांगलीची सामान्य घरातील मुलगी ते अलिशान घर घेणारी अभिनेत्री 'द सई ताम्हणकर'
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 3:14 PM

मुंबई | 17 मार्च 2024 : मुंबईमध्ये स्वत:चं हक्काचं घर असावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. मुंबईत येणारा प्रत्येकजण स्वत:च्या घराचं स्वप्न उराशी बाळगून असतो. सिने क्षेत्रात काम करण्यासाठी येणाऱ्या कलाकारही अनेक स्वप्न घेऊन या स्वप्ननगरीत येतात. प्रचंड मेहनतीच्या जोरावर ती पूर्णही करतात. असंच एक नाव म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर… मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही सईने नाव कमावलं आहे. या सगळ्यात सईने तिच्या पर्सनल लाईफमध्येही मोठी ॲचिव्हमेंट मिळवली आहे. सईने मुंबईत अलिशान घर खरेदी केलं आहे. या घराचे खास व्हीडिओही सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही दिवसांआधी सईने नवं घर घेत असल्याचं जाहीर केलं. जुन्या घरातून नव्या घरात जात असतानाचा व्हीडिओ सईने शेअर केला. यात तिने जुन्या आणि नव्या घराबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे माझं 11 वं घर आहे. याआधी दहा घरांमध्ये राहिली आहे. घर म्हणजे माझ्यासाठी एक भावना आहे. भिंतींनी घर बनत नाही तर त्या घरात राहणाऱ्या माणसांमुळे घर बनतं. या माझ्या घराने माझं यश पाहिलंय. माझं अपयशही पाहिलीय. या घराशी मी अनेकदा गप्पा मारल्यात… माझ्या हितगुजाच्या गोष्टी मी या घराला सांगितल्या आहेत. हे घर सोडणं माझ्यासाठी प्रचंड कठीण आहे. मात्र कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघावं लागणार आहे, असं जुनं घर सोडताना सई म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

नव्या घराचा व्हीडिओही सईने शेअर केलाय. यात तिने हे घर तिच्यासाठी किती महत्वाचं आहे, हे सांगितलं आहे. नवं घरं घेणं सगळ्यांसाठीच एक स्वप्न असतं. तसं ते माझ्यासाठीही होतं. सांगलीतून मुंबईत आल्यावर मी ते स्वप्न पाहिलं होतं. मात्र ते कसं पूर्ण होणार आहे हे मला माहिती नव्हतं. खूप मेहनत घेतली. त्यानंतर हे घर खरेदी केल्याचं सई म्हणाली.

हे नवं घर अजूनही माझं असल्यासारखं वाटत नाही. असं वाटतं की उद्या या घरातून चेकआऊट करून बाहेर जावं लागणार आहे. हे घर मला प्रचंड आवडलंय. माझ्या आवडीनुसार मी हे घर सजवलं आहे. मला मोठी झाडं आवडतात. तशी झाडं मी या घरात ठेवली आहेत. मला स्वत:चा प्रचंड अभिमान वाटतो. जर सई तिचं स्वप्न पूर्ण करू शकते, तर तुम्हीही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता, असं सई म्हणाली.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....