AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन वेगळ्या कथा पण धागा एकच… नात्याच्या विविध छटा उलगडणारा ‘मल्हार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Malhar Movie Release on 7 June Trailer Out : एक नवाकोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील कथा जरा हटके आहे. नात्याच्या विविध छटा उलगडणार 'मल्हार' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची कथा काय आहे? वाचा सविस्तर...

तीन वेगळ्या कथा पण धागा एकच... नात्याच्या विविध छटा उलगडणारा 'मल्हार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
| Updated on: May 22, 2024 | 8:31 PM
Share

सध्या मराठी सिनेमांमध्ये सकस कथा असणारे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वेगवेगळ्या कथा अन् कलाकारांच्या अभिनयामुळे सिनेमा प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहेत. अशीच वेगळ्या धाटणीची कथा घेऊन एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नात्याच्या विविध छटा उलगडणार ‘मल्हार’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.’मल्हार’ सिनेमााचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 7 जून 2024 ला ‘मल्हार’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आहे.

‘मल्हार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गुजरातमधील कच्छच्या ग्रामीण भागात या तीन वेगवेगळ्या कथा घडताना ट्रेलरमध्ये दिसत आहे. यात दोन लहान मुलांची मैत्री, तरूण – तरूणीचे एकमेकांवर असणारे प्रेम आणि एका जोडप्याचे एकमेकांवर असणारा विश्वास अशा तीन कथांचा यात समावेश आहे. या कथा कोणत्या वळणावर जाणार? हे पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे. हा चित्रपट भावनिक असला तरी लहान मुलांची धमालही यात दिसत आहे.

कोण- कोण कलाकार सिनेमात?

नात्यातील विविध छटा उलगडणाऱ्या ‘मल्हार’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून मैत्री, प्रेम, विश्वास या भावना यात दिसत आहेत. व्ही मोशन प्रस्तुत या चित्रपटाचे प्रफुल पासड निर्माते असून दिग्दर्शन आणि लेखन विशाल कुंभार यांनी केलं आहे.

‘मल्हार’ या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, मोहम्मद समद, अक्षता आचार्य, रवी झंकाळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 7 जून 2024 रोजी ‘मल्हार’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

तीन वेगवेगळ्या वयोगटाची ही कथा आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातील निरागसता, संभ्रम, घालमेल, विश्वास अशा अनेक भावना यात पाहायला मिळतील. ‘मल्हार’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून नातेसंबंध कसे जुळतात आणि त्यांचा प्रवास कसा फुलत जातो, हे अतिशय रंजकतेने दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील साधेपणा, गावच्या मातीतील सहवास, नात्यांमधील मुळं यावर हा चित्रपट आधारित असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल कुंभार यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.