‘मनाचं पाखरू…’ , रितिका श्रोत्री-निखील चव्हाण अभिनित ‘डार्लिंग’चं नवं गाणं रसिकांच्या भेटीला

'डार्लिंग तू...' या टायटल साँगनंतर 'ये है प्यार...' हे 'डार्लिंग'मधील रोमँटिक साँगला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाल्यानंतर 'मनाचं पाखरू...' हे गाणंही रसिकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. मंदार चोळकरनं लिहिलेलं हे गाणं शुभांगी केदार यांनी गायलं असून, संगीतकार चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केलं आहे.

'मनाचं पाखरू...' , रितिका श्रोत्री-निखील चव्हाण अभिनित 'डार्लिंग'चं नवं गाणं रसिकांच्या भेटीला
Darling
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 12:44 PM

मुंबई : 10 डिसेंबर 2021 रोजी रिलीज होणाऱ्या ‘डार्लिंग’ या आगामी बहुप्रतिक्षीत मराठी चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. ही उत्सुकता आणखी ताणणारं ‘डार्लिंग’मधील ‘मनाचं पाखरू…’ हे नवं कोरं लाँच करण्यात आलं आहे. 7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखील खजिनदार यांची निर्मिती असलेल्या ‘डार्लिंग’नं चित्रपटगृहांमध्येच प्रेक्षकांना भेटण्याचं आपलं वचन पाळलं आहे.

या चित्रपटाचे रिलिजिंग पार्टनर आणि वितरक पिकल एंटरटेनमेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी आहेत. विविध कारणांमुळं सुरूवातीपासून लाइमलाईटमध्ये असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं आहे.

नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘डार्लिंग तू…’ या टायटल साँगनंतर ‘ये है प्यार…’ हे ‘डार्लिंग’मधील रोमँटिक साँगला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाल्यानंतर ‘मनाचं पाखरू…’ हे गाणंही रसिकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. मंदार चोळकरनं लिहिलेलं हे गाणं शुभांगी केदार यांनी गायलं असून, संगीतकार चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केलं आहे.

‘हळदीच्या रंगानं रुप सजलं बाई…’

या गाण्याची सुरुवात हळदीची उधळण आणि सनईच्या पवित्र सूरांनी होते. मराठमोळ्या परंपरेनुसार जात्याची पूजा करून आणि सुवासिनींच्या कपाळाला हळद-कुंकू लावून जात्यावर हळकुंड दळण्याची पूर्वापार चालत आलेली संस्कृती या गाण्यात दाखवण्यात आली आहे. ‘हळदीच्या रंगानं रुप सजलं बाई…’ हे हळूवार गाणं सुरू होतं. नायिका रितिका श्रोत्रीच्या हातांवर मेहंदी काढण्याची दृश्यं आणि तिच्या भोवतीचा मैत्रीणींचा घोळका लग्नसोहळ्याची आठवण करून देण्यासाठी पुरेसं ठरतं.

या गाण्यात रितिकाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. दुसरीकडे प्रथमेश परब खिन्न मनानं बसलेला आहे. रितिकाचंही विवाह सोहळ्यातील रितीरिवाज आणि परंपरांकडं लक्ष नसून, तिच्या मनाचं पाखरू आपल्या डार्लिंगच्या शोधात हरवल्याचं जाणवतं. तिकडे निखिल चव्हाणही उदास चेहऱ्यानं बसलेला असल्यानं हे गाणं चित्रपटात नेमकं काय दाखवणार याबाबत उत्सुकता वाढते.

पाहा गाणं

थोडक्यात काय तर भावनांचा गुंता या गाण्यात पहायला मिळतो. भावनांचा हा गुंता कसा सोडवला जातो ते ‘डार्लिंग’ पाहिल्यावरच समजणार आहे. रितिकाच्या ‘मनाचं पाखरू…’ नेमकं कोणाचं होणार याचं उत्तरही चित्रपटातच मिळणार आहे. या भावनांचे सोहळे अपरंपार, भेटूया सहकुटुंब, सहपरिवार फक्त चित्रपटगृहात या गाण्याच्या अखेरीस येणाऱ्या दोन ओळी रसिकांना सिनेमागृहात येण्याचं जणू आमंत्रणच देत असल्याचं जाणवतं. व्हिडीओ पॅलेसच्या माध्यमातून ‘डार्लिंग’च्या गाण्यांची प्रस्तुती केली जात आहे. दिग्दर्शनासोबतच ‘डार्लिंग’चं लेखनही समीर आशा पाटील यांनीचं केलं आहे. यात मंगेश कदम, आनंद इंगळे आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पहायला मिळणार आहेत.

हेही वाचा :

Mouni Roy | ब्लॅक बिकिनीमध्ये मौनी रॉयची बीचवर धमाल, अभिनेत्रीचा लूक चाहत्यांना लावतोय वेड!

लखनऊ कोर्टाने ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरीविरोधात जारी केला अटक वॉरंट, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

मी त्या देशातून येतो, जिथं दिवसा बायकांची पूजा केली जाते आणि रात्री रेप, वीर दासचा व्हिडीओ भडकाऊ की वास्तव?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.