कोणत्याच कलाकाराने एका विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका घेऊ नये- प्रवीण तरडे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: May 31, 2022 | 9:44 AM

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांना कलाकाराने राजकीय भूमिका घ्यावी की नाही, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी आपलं ठाम मत मांडलं.

कोणत्याच कलाकाराने एका विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका घेऊ नये- प्रवीण तरडे
Pravin Tarde
Image Credit source: Tv9

अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी पोस्ट लिहिल्याचं प्रकरण खूप गाजलं. याप्रकरणी तिला अटकसुद्धा करण्यात आली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांना कलाकाराने राजकीय भूमिका घ्यावी की नाही, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी आपलं ठाम मत मांडलं. कुठल्यात अभिनेत्याने एका विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका घेऊ नये, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी केतकीच्या प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. प्रवीण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. याच चित्रपटाच्या प्रमोशनिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत ते राजकीय भूमिका घेण्याविषयी व्यक्त झाले.

“कुठल्याही अभिनेत्याने एका विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका घेऊ नये”

“कुठल्याही अभिनेत्याने एका विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका घेऊ नये, या मताचा मी आहे. कारण माझा एखादा चित्रपट काढला, तर समाजाचा प्रत्येक घटक माझा चित्रपट बघणार आहे, माझ्यावर प्रेम करणार आहे. त्यांनी माझ्या कामावर, अभिनयावर प्रेम केल्याने मी त्यांचा आयडॉल झालोय. त्यांच्या प्रेमाचा वापर मी राजकीय पक्षासाठी नाही केला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही अभिनेत्याने एका विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका कधीच घेऊ नये. अभिनेता हा सर्वांचा असतो. त्याचा सिनेमा बघायला केवळ विशिष्ट लोक येत नाहीत. कलाकृती ही समाजाची आहे. समाजाचं देणं फेडण्यासाठी आपण करतो. त्यामुळे कलाकार हा जास्तीत जास्त समाजाचं देणं असू शकतो. समाजाने त्याला वाटेल ते प्रश्न करावेत आणि त्याने समाजाचं प्रतिनिधित्व करावं. या मताचा मी 100 टक्के आहे. त्यामुळे प्रवीण तरडे तुम्हाला कधीची कोणत्याही राजकीय व्यासपीठावर त्यांची बाजू घेताना दिसणार नाही. ज्यादिवशी ते करेन, त्यादिवशी हे क्षेत्र बंद करेन. या क्षेत्राचा वापर तिथे जाण्यासाठी करायचा नाही आणि तिथला वापर इकडे नाही करायचा,” असं परखड मत त्यांनी मांडलं.

केतकी चितळे प्रकरणावर प्रतिक्रिया-

“मला त्या प्रकरणाबद्दल खरंच काही माहित नाही. मी चेष्टा नाही करत. हे प्रकरण झालं त्यावेळी मी 24 तास एका एसी रुममध्ये धर्मवीरची फायनल डीसीपी काढत होतो. धर्मवीर प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवस प्रमोशनसाठी फिरत होतो. ते संपलं आणि मी तीन दिवस हंबीरराव चित्रपटाची डीसीपी काढत बसलेलो. त्यामुळे हे काय झालं ते मला माहितच नाही,” असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI