‘झोलझाल’ सिनेमाचं म्युझिक लॉंच, मल्टिस्टारर चित्रपट 1 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटाचा कणा म्हणून चित्रपटाच्या संगीताकडे पाहिलं जातं, झोलझाल सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला असून या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी प्रफुल्ल - स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी सांभाळली. तर चित्रपटातील गाण्याचे बोल मंदार चोळकर, बाबा चव्हाण, वरून लिखाते यांनी शब्दबद्ध केले आहेत.

'झोलझाल' सिनेमाचं म्युझिक लॉंच, मल्टिस्टारर चित्रपट 1 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला
आयेशा सय्यद

|

Jun 04, 2022 | 11:40 AM

मुंबई : ‘युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन’ अंतर्गत अमोल लक्ष्मण कागणे (Amol Kagane) आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत ‘रोलींगडाईस’ असोसिएशन सोबत ‘झोलझाल’ (ZolZaal Movie) हा चित्रपट हास्याची मेजवानी घेऊन येत्या 1 जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या गाण्याचा म्युझिक लाँच सोहळा आणि टिझर अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला असून मल्टीस्टारर अशा या चित्रपटात हास्याचे विविध रंग विविध कलाकारांच्या अभिनयातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. चित्रपटातील धडाकेबाज गाणी प्रेक्षकांना थिरकायला लावणार का? हे पाहणे रंजक ठरेल. तर हास्यमय टिझरचीही उत्सुकतेला आता पूर्णविराम मिळाला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना तुफान हसवण्यासाठी येत्या 1 जुलैला चित्रपटगृहांत येण्यास सज्ज झाला आहे, तर चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना थिरकवायला लावण्यास सज्ज होत आहेत.

चित्रपटाचा कणा म्हणून चित्रपटाच्या संगीताकडे पाहिलं जातं,  झोलझाल सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला असून या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी प्रफुल्ल – स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी सांभाळली. तर चित्रपटातील गाण्याचे बोल मंदार चोळकर, बाबा चव्हाण, वरून लिखाते यांनी शब्दबद्ध केले आहेत, तर सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायकांनी चित्रपटातील गाण्यांना चारचांद लावले आहेत, गायक अवधुत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, कविता राम, प्रवीण कुवर, जय अत्रे, जुईली जोगळेकर, प्रतिभा सिंग बाघेल या गायकांनी त्याच्या स्वमधुर आणि दमदार आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत.

या चित्रपटातील गाण्यांना खरा साज चढलाय तो कलाकारांमुळे. या मल्टिस्टारर चित्रपटात अभिनेते मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाळवे, अभिनेत्री प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे सिनेकलाकार दिसणार असून या कलाकारांच्या भूमिका या निव्वळ पर्वणीच ठरतील यांत शंकाच नाही.

हे सुद्धा वाचा

दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून चित्रपटाची निर्मिती निर्माता गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली असून सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली. चित्रपटाचा टिझर आणि चित्रपटातील गाणी पाहिल्यानंतर नक्कीच या चित्रपटाची उत्सुकता सर्वांना लागून राहील यांत शंकाच नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें