AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राधिका, शनाया आणि गुरुनाथ घेणार प्रेक्षकांचा निरोप; ‘या’ दिवशी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका बंद होणार असली तरी त्याऐवजी दुसरी नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे | Mazhya navryachi bayko

राधिका, शनाया आणि गुरुनाथ घेणार प्रेक्षकांचा निरोप; 'या' दिवशी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील राधिका, शनाया, गुरुनाथ ही पात्रे अगदी घराघरात पोहोचली होती.
| Updated on: Feb 24, 2021 | 9:49 AM
Share

मुंबई: छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazya Navraychi Bayko) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 7 मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर या मालिकेचा पहिला भाग 22 ऑगस्ट 2016 रोजी प्रसारित झाला होता. तेव्हापासून गेल्या पाच वर्षांत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. ( Marathi serial Mazhya navryachi bayko)

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील राधिका, शनाया, गुरुनाथ ही पात्रे अगदी घराघरात पोहोचली होती. या मालिकेला अनेक पुरस्कारही मिळाले होते. सुरुवातीच्या काळात  ‘टीआरपी’मध्येही ही मालिका अव्वल स्थान राखून होती. मात्र, गेल्या काही दिवसांत ही मालिका मूळ ट्रॅकपासून बरीच भरकटली होती. त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. त्यामुळेच आता निर्मात्यांनी ही मालिका गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

नवी मालिका कोणती?

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बंद होणार असली तरी त्याऐवजी दुसरी नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘घेतला वसा टाकू नका’ (Ghetala Vasa Taku Nako) ही नवी मालिका झी मराठीवर सुरू होणार आहे. यामध्ये पौराणिक कथा वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. भगरे गुरूजी ही कथा मांडणार आहेत.

अण्णा नाईक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

अण्णा नाईक आणि शेवंत यांच्यातील केमेस्ट्रीमुळे लोकप्रिय ठरलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचा प्रोमो ‘झी मराठी’वर दाखवला जात आहे. हा प्रोमो चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. या मालिकेचे यापूर्वीचे दोन्ही भाग रंजक कथानकामुळे प्रचंड लोकप्रिय ठरले होते. त्यामुळे तिसऱ्या भागात काय पाहायला मिळणार, याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

संबंधित बातम्या : 

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम सौमित्रची आई आहे सचिन पिळगावकरांसोबत गाजलेली अभिनेत्री

‘मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण अभिनेत्रीच का?’ सुजय डहाकेच्या प्रश्नाचा मालिका विश्वातून समाचार

EXCLUSIVE | ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील जुनी शनाया परतणार

( Marathi serial Mazhya navryachi bayko)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.