‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम सौमित्रची आई आहे सचिन पिळगावकरांसोबत गाजलेली अभिनेत्री

अभिनेते सचिन पिळगावकर यांच्यासोबत 'अष्टविनायक' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री वंदना पंडित आता 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत सौमित्रच्या आईची भूमिका करत आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:18 AM, 11 Oct 2019
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम सौमित्रची आई आहे सचिन पिळगावकरांसोबत गाजलेली अभिनेत्री

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत एका नव्या व्यक्तिरेखेची एन्ट्री झाली आहे. राधिकाला सून म्हणून स्वीकारणारी सौमित्रची आई (Mazya Navryachi Bayko Saumitra Mother) आता मालिकेत दाखल झाली आहे. या अभिनेत्रीला कुठेतरी पाहिल्यासारखं तुम्हाला वाटत असेल. कारण 40 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात त्या झळकल्या होत्या.

‘अष्टविनायक’ या सुप्रसिद्ध चित्रपटात हरहुन्नरी अभिनेते सचिन पिळगावकर यांच्यासोबत झळकलेल्या वंदना पंडित (Vandana Pandit) आता ‘सौमित्रच्या आई’ची व्यक्तिरेखा साकारत आहेत. गेली चार दशकं मोठ्या पडद्यापासून दूर राहिलेल्या वंदना पंडित यांनी छोट्या पडद्यावर पाऊल ठेवलं आहे.

सुरुवातीला गुरुनाथने सौमित्रच्या आईला राधिकाच्या विरोधात भडकवण्यास सुरुवात केली होती. परंतु गुरुनाथच्या कारवायांकडे लक्ष न देता त्यांनी राधिकाला सून म्हणून पसंत केलं आहे. मालिकेच्या दृष्टीकोनातून लहानशी तरी टर्निंग पॉईंट ठरणारी अशी ही व्यक्तिरेखा (Mazya Navryachi Bayko Saumitra Mother) आहे.

कोण आहेत वंदना पंडित?

‘अष्टविनायक’ चित्रपटात वंदना पंडित यांनी सचिन पिळगावकर यांच्या पत्नीची भूमिका केली होती. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेला ‘अष्टविनायक’ हा चित्रपट 1979 मध्ये प्रदर्शित झाला होता. राजा गोसावी, शरद तळवळकर यासारख्या मातब्बर कलाकारांच्या सोबतीने ‘अष्टविनायक’ चित्रपटातून वंदना पंडित झळकल्या होत्या. याशिवाय साक्षात डॉ. वसंतराव देशपांडेही ‘दाटून कंठ येतो..’मध्ये दिसले होते.

अष्टविनायक चित्रपटातील “अष्टविनायका तुझा महिमा कसा… ” हे गाणं अजूनही प्रेक्षकांच्या ओठावर आहे. या गाण्यात अशोक सराफ, उषा चव्हाण, जयश्री गडकर, आशा काळे, रवींद्र महाजनी यासारखे त्याकाळचे गाजलेले कलाकार झळकले होते. दाटून कंठ येतो, प्रथम तुला वंदितो, दिसते मजला सुखचित्र नवे यासारखी गाणीही गाजली आहेत.

पीएमसी बँकेवर निर्बंध, प्रसिद्ध अभिनेत्रीवर सोनं विकण्याची…

घाशीराम कोतवाल या चित्रपटातही वंदना पंडित झळकल्या होत्या. मात्र त्यानंतर वंदना पंडित मनोरंजन विश्वापासून काहीशा लांब गेल्या. परंतु आता चाळीस वर्षांनी त्यांना पुन्हा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे.

वंदना पंडित लग्नानंतर वंदना शेठ झाल्या. पंडित कुटुंबीय मूळ वाईचं. परंतु वडील हैद्राबादला वैद्यकीय क्षेत्रात असल्याने त्यांचं बालपण हैद्राबादेत गेलं. वंदना पंडित यांची मोठी बहीण बकुळ पंडित. संगीत नाटकात बकुळ पंडित यांचं मोठं योगदान आहे. साठीच्या उंबरठ्यावर वंदना पंडित यांनी पुनरागमन (Mazya Navryachi Bayko Saumitra Mother) केलं. त्यांना आणखी भूमिका करताना पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.