चांदीच्या ट्रेमधून चहा यायचा… बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारच्या थाटामाटावर मौसमी चटर्जींचं थेट भाष्य; म्हणाल्या, अहंकारी होते ते
बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारच्या थाटामाटावर मौसमी चटर्जी यांनी भाष्य केले आहे. त्यांनी थेट 'अहंकारी होते ते' असं म्हटलं आहे.

60-70 च्या दशकातील मंजिल, रोटी कपड़ा और मकान, बेनाम यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्गज अभिनेत्री मॉसमी चटर्जी यांनी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत पडद्यावर काम केले आहे. अलीकडेच एका मुलाखतीत मौसमी चटर्जी यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी संबंधित काही जुन्या आठवणी शेअर केल्या. त्यांनी सांगितले की, राजेश खन्ना आपल्या स्टारडम आणि संपत्तीचा दिखावा कसा करायचे.
फिल्मफेअरशी बोलताना मौसमी यांनी त्या काळाची आठवण सांगितली जेव्हा त्या राजेश खन्ना यांच्यासोबत एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होत्या. त्या म्हणाल्या, “ते मला नेहमी बोलावायचे, हे दाखवण्यासाठी की ते राजेश खन्ना, ‘द खन्ना’ आहेत. तो त्यांचा काळ होता आणि ते तसेच वागायचे. त्यांचा चहाचा ब्रेक खूपच शानदार असायचा, चांदीच्या ट्रेमध्ये चहा वगैरे यायचा.” त्यांनी पुढे सांगितले, “ते गोपालला मला बोलवायला पाठवायचे आणि सांगायचे की ते माझी वाट पाहत आहेत. गोपाल जाऊन सांगायचा की, मॅडम स्पॉटबॉयसोबत चहा घेत आहेत आणि हे ऐकून ते सहन करू शकत नव्हते. ते म्हणायचे, ‘मौसमी, मी तुला दोन-तीन वेळा बोलावलं आहे. तू माझ्यासोबत जेवणही करत नाहीस. तू तुझ्या मेकअप मॅन आणि हेअर स्टायलिस्टसोबत जेवतेस.’” वाचा: प्रसिद्ध मॉडेलचा कारनामा! 6 तासात 583 पुरुषांसोबत शारीरिक संबंध, शेवटी उचलून हॉस्पिटमध्ये घेऊन गेले
“त्यांच्यासारखा दिखावा कोणी केला नाही”
77 वर्षीय या दिग्गज अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “मी कोणत्याही हिरोला त्यांच्यासारखी आपली संपत्ती दाखवताना पाहिलं नाही. ते फक्त राजेश खन्नाच होते.” त्यांनी हेही जोडलं की, हा त्यांचा स्वभाव होता आणि कदाचित त्या काळातील स्टारडमचा परिणामही असेल.
मौसमी यांनी राजेश खन्ना यांना म्हटले होते अहंकारी
यापूर्वी आनंदबाजार पत्रिकेला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत मौसमी यांनी राजेश खन्ना यांना अहंकारी म्हटले होते. त्या म्हणाल्या होत्या, “आमच्या काळात जर कोणी खरोखर अहंकारी असेल तर ते राजेश खन्ना होते. पण त्यामागे कारणही होते. त्यांनी इतके सुपरहिट चित्रपट दिले होते की यश हे त्यांच्या डोक्यात बसले होते.”
अनेक चित्रपटांमध्ये एकत्र केलं काम
मौसमी चटर्जी आणि राजेश खन्ना यांच्या जोडीला प्रेक्षकांनी अनेक चित्रपटांमध्ये पसंत केलं. दोघांनी अनुराग, विजय, घर परिवार, प्रेम बंधन आणि हमशकल यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. या चित्रपटांमधील त्यांची केमिस्ट्री खूपच प्रशंसनीय ठरली.
