AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक अविश्वसनीय आणि असाधारण प्रेमकथेचा प्रवास, ‘माझी प्रारतना’ चित्रपटाचा पहिले पोस्टर प्रदर्शित

पद्मराज राजगोपाल नायर यांचा "माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेमकथा" हा नवीन मराठी चित्रपट ब्रिटीश काळातल्या ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी असलेली एक संगीतप्रधान प्रेमकथा सांगतो. हा चित्रपट ९ मे २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे.

एक अविश्वसनीय आणि असाधारण प्रेमकथेचा प्रवास, 'माझी प्रारतना' चित्रपटाचा पहिले पोस्टर प्रदर्शित
Mazhi Prarathna
| Updated on: Mar 08, 2025 | 9:49 PM
Share

प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेम कोणत्याही सीमा मानत नाही. वय, जात, रूप, किंवा स्वरुप याला प्रेमाची अडचण नसते. दोन हृदयांमधील सुंदर बंधन म्हणजे प्रेम आणि लवकरच एक अशक्यप्राय प्रेमकथा चित्रपट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. “माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा” हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या  भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केले आहे. त्यांचा हा नवा मराठी चित्रपट, प्रेमाच्या कच्च्या आणि तीव्र भावनांना समोर आणणारा आहे. जो तुमच्या हृदयाला हादरवून टाकेल.

संगीतप्रधान कथा

ब्रिटिश काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घडणारी ही संगीतप्रधान कथा आहे. जी प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास मांडते. ही प्रेमकथा इतकी ताकदीची आणि हृदयस्पर्शी आहे की वादळासारखी तुमच्यावर आदळेल. तुम्हाला स्तब्ध आणि भारावून टाकेल. जीवनात कितीही दुःख असली तरी प्रेम अंतिम सत्य असते. हा मन हेलावून टाकणारा प्रवास तुम्हाला दाखवेल की प्रेम हेच सर्वकाही जिंकण्याची खरी ताकद आहे.

९ मे २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

“माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा” हा चित्रपट येत्या ९ मे २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप मुख्य भूमिका साकारत आहेत. तसेच मराठीतील अनेक दिग्गज कलाकार देखील यात झळकणार आहेत. एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत, पद्माराज नायर फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केले आहे. तर संगीत विश्वजित सी टी यांनी दिले आहे. या चित्रपटाबद्दल अधिक माहिती सध्या गुलदस्त्यात आहे. तरी लवकरच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे.

प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारे पोस्टर प्रदर्शित

या चित्रपटाचे पहिला पोस्टर समोर आल्यानंतर प्रेक्षकांच्या उत्कंठेने उच्चांक गाठला आहे. माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. हे पाहून नक्कीच प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. “माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेम कथा” ९ मे २०२५ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?