AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anita Date : कुणी माझा अपमान केला तर मी…, असं स्पष्टच का म्हणाली मराठमोळी अभिनेत्री अनिता दाते, मोठं वक्तव्य चर्चेत

Anita Date : मराठमोळी अभिनेत्री अनिता दाते हिचं मोठं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. सेल्फरिस्पेक्ट, अपमान आणि कॉन्फिडन्सबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. तर जाणून घ्या अनिता नेमकं काय आणि का म्हणाली आहे.

Anita Date : कुणी माझा अपमान केला तर मी..., असं स्पष्टच का म्हणाली मराठमोळी अभिनेत्री अनिता दाते, मोठं वक्तव्य चर्चेत
Anita Date
| Updated on: Oct 20, 2026 | 10:10 AM
Share

Anita Date : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनिता दाते हिच्या चाहत्यांची संख्या आता काही कमी नाही. अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. छोट्या पडद्यावर उत्तम भूमिका साकारणारी अनिता खऱ्या आयुष्यात कशी आहे. याबद्दल कोणाला माहिती नाही. पण नुकताच झालेल्या एका मुलखातीत अनिता हिने सेल्फ-रिस्पेक्ट, अपमान आणि कॉन्फिडन्सबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनिता दाते हिची चर्चा रंगली आहे. यावेळी अनिता थेट म्हणाली की, ‘कोणी माझा अपमान करता कामा नये आणि कोणी मला कमी लेखता कामा नये…’, जाणून घ्या अभिनेत्री असं काय आणि का म्हणाली.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अनिता म्हणाली, ‘माझ्यामध्ये सेल्फ-रिस्पेक्ट खूप आहे. मला असं वाटतं की, कोणी माझा अपमान करता कामा नये आणि कोणी मला कमी लेखता कामा नये… आणि समोरच्याने कमी लेखायचं, समोरच्याने का बुली बनवायचं. समोरच्यामध्ये असं काय आहे, तो मला बुली बनवेल… रिबेलमधून मी बदलले. माझ्यात उद्धटपणा आला. मी भयंकर उद्धट आहे. हे मी प्राऊडली नाही सांगितलं पाहिजे… यासाठी अनीता हिने प्रेक्षकांची माफी देखील माहितली…

पण अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘माझ्या उद्धटपणा माणसांशी बोलून बोलून आला. त्यानंतर ही मुलगी कॉन्फिडंट आहे असं समोरच्याला वाटलं, मी कॉन्फिडंट नव्हते, माझ्याकडे माझं स्किल होतं आणि तुमच्यात कॉन्फिडन्स आहे हे पुरेसं आहे समोरच्यासाठी. त्यानंतर हळू – हळू, काम करून माझ्यात कॉन्फिडन्स आला. समोरच्याने विश्वास ठेवला. त्यामुळे मी स्वतःला बदललं आणि अद्यापही बदलणं फार गरजेचं आहे…’, असं देखील अनिका दाते म्हणाली.

यापूर्वी अनिता हिने तिच्या भूमिकांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. अनिता कायम तिच्या कंफर्टझोनच्या पलिकडे जात भूमिका निवडते. अनिता दाते म्हटलं की, सिंपल गृहिणीच्या भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मनात आहे. अनिता हिने फक्त मालिकांमध्येच नाही तर, सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. शिवाय चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक भूमिकेला डोक्यावर घेतलं आहे.

अनिता दाते हिने ‘वाळवी’, ‘मी वसंतराव…’ या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. शिवाय माझ्या बायकोचा नवरा हे नाटकही ती करत आहे. सोशल मीडियावर देखील अनिता हिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनिता देखील सोशल मीडियावर कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष