AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन आंदोलनाच्या काळात डॉ. मोहन भागवत यांचा विजयदशमीदिनी युवकांना मोठा संदेश; म्हणाले, आता तरुणांनी…’.

ऐन आंदोलनाच्या काळात डॉ. मोहन भागवत यांचा विजयदशमीदिनी युवकांना मोठा संदेश दिला. तसेच त्यांनी सोशल मीडियाच्या वापरावरही भाष्य केलं.

ऐन आंदोलनाच्या काळात डॉ. मोहन भागवत यांचा विजयदशमीदिनी युवकांना मोठा संदेश; म्हणाले, आता तरुणांनी...'.
mohan bhagwat
| Updated on: Oct 20, 2026 | 10:13 AM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहे. यंदा विजयादशमीच्या उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली. या सोहळ्याला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासहित अनेक प्रमुख पाहुण्यांनी हजेरी लावली. संघाच्या शताब्दी वर्षाच्या समारोपीय सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारताच्या परंपरा आणि संस्कृतीवर भाष्य केलं. त्यासोबत त्यांनी देशासमोरील आव्हानाचा उल्लेख केला. तसेच त्यांनी ऐन आंदोलनाच्या काळात युवकांना मोठा संदेश दिला.

आरएसएसच्या विजयादशमीच्या उत्सवात बंगालच्या राज नारायण बसू यांच्या आठवणीचं स्मरण करण्यात आलं. त्यांनी जत्रांच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्यासाठी हिंदू मेळा सुरू केल्याचे सांगण्यात आलं. तसेच कार्यक्रमात संत रविदास यांचंही स्मरण करण्यात आलं.  या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, ‘देशावर परकीयांचं आक्रमण झालं, तेव्हा अनेकांवर अत्याचार झाले. त्या काळात सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं होतं. त्या काळात संत रविदास यांनी धर्माशी निष्ठा आणि भक्तीचा संदेश दिला. गेल्या 100 वर्षांपासून भारताला त्याची ओळख, संस्कृती, परंपरेच्या आधारावर एकत्र करण्यासाठी आरएसएस कार्यरत आहे’. संघाकडून देशप्रेम, स्वदेशी उत्पादनाचा स्वीकार करण्यावर भर दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले,परकीयांच्या सत्तेमुळे आपलं विभाजन झालं. आपल्याला गुलामीचा सामना करावा लागला. गुलामीच्या काळात महापुरुष आणि अनेकांच्या प्रयत्नामुळे मुक्त झालो. आता एकतेच्या मार्गावर चाललो आहे. संविधानातील बंधुत्वाच्या विचारांचं पुन्हा स्मरण करावे लागेल. ते समजून घ्यावे लागेल. ते व्यवहारात आणावे लागेल. संघाच्या स्थापनेच्या वेळी वेगळं वातावरण होतं. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारे महापुरुष, तेव्हाच्या समाजाला बलिदान द्यावं लागले. आता त्यापेक्षा अधिक मेहनत करावी लागणार आहे. भारतात विविधता आहे. देशात अनेक जाती, प्रांत, परंपरा, खाद्यसंस्कृती आहे. सर्व प्रकारची विविधता आहे’.

‘सर्वांना एकत्र येऊन पुढे जावे लागेल. सर्व जण स्वीकारेल, अशा एक समान तत्वाची गरज भासणार आहे.  असा विचार आपल्याकडे आहे. सनातन काळापासून सुरू असलेली परंपरा आहे. तो विचार महापुरूष सातत्याने सांगतात. तो विचार कागदावर लिहिलेला किंवा मनात अचानक आला म्हणून सांगितलेला नाही. आपली परंपरा सांगते की, सृष्टीत विविधता आहे. तसेच ती परिवर्तनशील देखील आहे. तितकीच शाश्वत आहे.  देवाने माणसाला विचार करण्याची शक्ती दिली.  शुद्धीकरण करत विचारांचं पालन करून जीवन जगल्यास एक शाश्वत सुख प्राप्त होते. हाच मानवाचा सनातन शोध आहे. या सुखाच्या शोधातून मानवता पुढचा प्रवास करते, असे त्यांनी पुढे सांगितले. ऐन आंदोलनात तरुणांच्या सोशल मीडिया वापराविषयी भागवत म्हणाले, ‘युवकांना सर्व गोष्टी शिकण्याची इच्छा असते. परंतु चूक-बरोबर हे देखील समजून घेतलं पाहिजे.  दुष्परिणामामुळे अनेक देशात सोशल मीडिया आणि ओटीटीसाठी नियम बनवण्यात आले. शासन-प्रशासनाने यावर विचार केला पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष