हिंदू अभिनेत्रीने केले होते मुस्लिम निर्मात्याशी लग्न, बदलले नाही आडनाव; आज आहे ४०० कोटींची मालकीण
बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने एका मुस्लिम निर्मात्याशी लग्न केले आहे. मात्र, आज ही ती अभिनेत्री पतीचे आडनाव लावत नाही. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे चला जाणून घेऊया...

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यांचे लग्न- घटस्फोट, अफेअर- ब्रेकअप यांच्या कायमच चर्चा सुरु असतात. बॉलिवूडमधील एक अभिनेत्री अशी आहे जिने एका मुस्लिम निर्मात्यासोबत लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर अभिनेत्रीने कधीही पतीचे आडनाव लावले नाही. आज ही अभिनेत्री जवळपास ४०० कोटी रुपयांची मालकीण आहे. आता ही अभिनेत्री कोण? चला जाणून घेऊया.
आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत त्या अभिनेत्रीचे नाव मिनी माथुर असे आहे. तिने २७ वर्षांपूर्वी निर्माता कबीर खानशी लग्न केले होते. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी मिनीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत मिनीने खुलासा केला की लग्नात तिने आजीचे दागिने घातले होते. याशिवाय वेगवेगळ्या धर्मामुळे त्यांनी नवीन प्रवासाला कशी सुरुवात केली हेदेखील त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
‘मी माझ्या आजीचे दागिने घातले होते, माझी मैत्रिण विद्याने माझा मेकअप केला होता आणि ट्रेंडी कॉर्नरो हेअरस्टाइल केली होती. त्यामुळे मांडवात गोंधळ सुरु होता की सिंदूर नेमकं कुठे लावयचं आहे. केसांच्या पिना काढायला मला एक तास लागला होता. त्यावेळी सब्यसाची लेहेंगा घालणे, लग्नाचे हॅशटॅग, सूर्यास्तासोबत सुंदर फोटो किंवा नववधूच्या प्रवेशासाठी कोणतेही गाणे असा ट्रेंड नव्हता. मला आजही चांगले आठवते की मी त्यावेळी आनंदी होते. आम्ही एका रजिस्टरवर सही केली आणि दोन्ही परिवाराचे सांस्कृतिक विधी पूर्ण केले’ मिनी म्हणाली.
मिनी माथूरने पुढे आडनाव का बदलले नाही याचा खुलासा केला. तिने साइरस ब्रोचाच्या पॉडकास्टमध्ये सांगितले होते की लग्नानंतर ती कोणत्याही परिस्थितीत तिचे नाव बदलणार नाही. कारण ‘मिनी माथूर’ ही तिची ओळख आहे. तसेच कबीरला वाटले की जर मिनीने खान हे आडनाव लावले तर तिची सर्व अधिकृत कागदपत्रे बदलावी लागतील. तो या त्रासातून जाण्यास तयार नव्हता. म्हणून मिनीने लग्नानंतर तिचे आडनाव बदलले नाही.
कबीर खान हा सध्याचा बॉलिवूडमधील एक अतिशय प्रसिद्ध असा निर्माता आहे. मिनी आणि त्याच्याकडे एकूण ३०० ते ४०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे.
