AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या न्यूड फोटोशूटच्या वादावर मिलिंद सोमणने 30 वर्षांनंतर सोडलं मौन; म्हणाला “भारतात अनेकजण नग्न..”

अभिनेता मिलिंद सोमण आणि मॉडेल मधू सप्रे यांच्या विवस्त्र फोटोशूटमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. इतकंच नव्हे तर कोर्टात त्याविरोधात 14 वर्षे खटला चालला होता. या वादावर बऱ्याच वर्षांनंतर मिलिंदने मौन सोडलं आहे.

त्या न्यूड फोटोशूटच्या वादावर मिलिंद सोमणने 30 वर्षांनंतर सोडलं मौन; म्हणाला भारतात अनेकजण नग्न..
मिलिंद सोमण आणि मधू सप्रेImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 24, 2026 | 10:11 AM
Share

प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणचं मधू सप्रेसोबतचं एक फोटोशूट 1995 मध्ये प्रचंड वादग्रस्त ठरलं होतं. एका फुटवेअरच्या जाहिरातीसाठी हे फोटोशूट करण्यात आलं होतं. तो वादग्रस्त ठरण्यामागचं कारण म्हणजे मिलिंद आणि मधूचं हे न्यूड फोटोशूट होतं. दोघांच्याही अंगावर कोणतेच कपडे नव्हते, फक्त मानेभोवती एक साप गुंडाळलेला दिसून आला होता. आता तब्बल 30 वर्षांनंतर मिलिंदने त्या वादावर मौन सोडलं आहे. ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत फोटोशूटच्या वेळी झालेल्या वादावर मोकळेपणे व्यक्त झाला. सध्याच्या सोशल मीडियाच्या विश्वात जर असं एखादं फोटोशूट कोणी केलं, तर आता लोकांच्या प्रतिक्रिया कशा वेगळ्या असतील, यावरही त्याने आपलं मत व्यक्त केलं.

मिलिंद आणि मधूच्या या न्यूड फोटोशूटमुळे त्यावेळी मोठा कायदेशीर वाद निर्माण झाला होता. तब्बल 14 वर्षांपर्यंत त्यांच्यावरील हा खटला चलला होता. पण अखेरीस सर्वांची निर्दोष मुक्तता झाल्याचं मिलिंदने सांगितलं. या वादाच्या बऱ्याच वर्षानंतर मिलिंदने तोच न्यूड फोटो पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. सोशल मीडियावर लोकांचे विचार, आवडीनिवडी आणि ट्रेंड्स बदलत असताना आता या फोटोशूटकडे कसं पाहिलं जाईल, हे त्याला जाणून घ्यायचं होतं. अशा पद्धतीचा कंटेंट आता फारसं लोकांचं लक्ष वेधून घेत नसल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. परंतु त्याच्या काही दिवसांनंतर जेव्हा त्याने स्वत:चा समुद्रकिनारी विवस्त्र धावतानाचा फोटो पोस्ट केला, तेव्हा मात्र नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष होईल अशी अपेक्षा होती, तिनेच लोकांचं लक्ष वेधून घेतलं, हे त्याला खूप रंजक वाटलं.

काय म्हणाला मिलिंद?

“हा सगळा दृष्टीकोनाचा विषय आहे. कला विरुद्ध अश्लीलता यावर चर्चा करताना हा नेहमीच दृष्टीकोनाचा प्रश्न राहिला आहे. ही एक अशी द्विधा मनस्थिती आहे, जिचा सामना शंभर वर्षांपूर्वी राजा रवी वर्मा यांनाही करावा लागला होता. खरंतर हे कदाचित त्याच कायदेशीर तरतुदींखाली किंवा तत्सम काहीतरी येतं, पण हा कला विरुद्ध अश्लीलता असाच वाद आहे. ही गोष्ट अत्यंत व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे ती वादग्रस्त ठरते. कारण ज्याला एक व्यक्ती कला मानते, त्याला दुसरी व्यक्ती अश्लीलता समजू शकते. शंभर वर्षांहून अधिक काळापूर्वी इथे राजा रवी वर्मा होते. मी तर इथे फक्त एक मॉडेल आहे. अनेकदा लोकांची पार्श्वभूमी, अनुभव आणि श्रद्धा यांचं प्रतिबिंब त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये झळकतं. एकाच कलाकृतीबद्दल लोकांची भिन्न मतं असतात, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीची अर्थ लावण्याची पद्धत वेगळी असते”, असं मिलिंदने स्पष्ट केलं.

यावेळी मिलिंदने असंही सांगितलं की, त्याने कधीही वादाला त्याच्या निर्णयांवर प्रभाव टाकू दिला नाही. मधू सप्रेसोबतच्या न्यूड फोटोशूटच्या वेळी तो 30 वर्षांचा होता. “मी त्यापूर्वीही काही न्यूड मॉडेलिंग केले होते. अगदी एका वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरही ते फोटो छापून आले होते. त्यामुळे मी अजिबात वादाचा विचार केला नाही. त्यावेळी मी फक्त 30 वर्षांचा होतो. एजन्सीने माझ्याशी संपर्क साधला आणि मी लगेच होकार दिला. या फोटोशूटवरून मोठा वाद होण्यामागचं कारण म्हणजे हा मुद्दा महिला मॉडेलशी संबंधित होता. कायदेशीर पैलू हा महिला मॉडेलशी संबंधित आहे. इथे कला विरुद्ध अश्लीलता हा मुद्दा नाही. नेमके काय मुद्दे आहेत, याबद्दल हे प्रकरण थोडं गुंतागुंतीचं आहे. कारण अमेरिकेप्रमाणे आपल्या देशात नग्नता हा गुन्हा नाही. तुम्ही अमेरिकेत नग्न फिरू शकत नाही. ते तुम्हाला अटक करतील. पण भारतात विविध कारणांसाठी व्यक्ती नग्न फिरतात आणि ती कारणं आपल्या संस्कृतीचा भाग आहेत” असंही मत मिलिंदने मांडलं आहे.

Follow Us
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...