क्रिती सनॉन करोडपती उद्योजकाला करतेय डेट? प्रेमसंबंधांवर अखेर म्हणाली, ‘प्रॉब्लेम माहिती आहे, पण…’

Kriti Sanon: करोडपती उद्योजकाला कृती सनॉन करतेय डेट? खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य; म्हणाली, 'प्रॉब्लेम माहिती आहे, पण...', अभिनेत्री कायम खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असते चर्चेत...

क्रिती सनॉन करोडपती उद्योजकाला करतेय डेट?  प्रेमसंबंधांवर अखेर म्हणाली, प्रॉब्लेम माहिती आहे, पण...
| Updated on: Aug 24, 2024 | 2:39 PM

अभिनेत्री क्रिती सनॉन हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या काही दिवसांपासून क्रिती तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रिपोर्टनुसार, क्रिती यूके येथील करोडपती उद्योजक कबीर बहिया याला डेट करत आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सांगायचं झालं तर, कृती हिने कबीर याच्यासोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला नाही. पण अभिनेत्रीने नातं कसं असायला हवं… यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत क्रिती हिला रिलेशनशिपबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणते, ‘समोरची व्यक्ती कशी आहे… यावर निर्भर करतं… जर मला वाटतं आहे की मी चुकीची आहे, तर मी माफी मागेल. पण माझी चूक नसेल तर मी माफी मागणार नाही. मी परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करेल…’

‘गुंतलेल्या गोष्टींचं निराकरण केल्याशिवाय मी कोणतीच गोष्ट सोडत नाही. प्रॉब्लेम माहिती आहेत, पण त्यावर मार्ग काढेल.’ पुढे कृतीला विचारण्यात आलं की, ‘छोट्या – छोट्या गोष्टींवरून तुला रडायला येतं का?’ यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी असं नाही म्हणणार की मी रडत नाही. रडायला मला देखील येतं. पण कोणत्याही कारणावर रडत नाही.’

 

 

‘आता मी पूर्वी प्रमाणे रडत नाही. पण काही वर्षांपूर्वी मी अनेक चढ – उतारांचा सामना केला आहे. तेव्हा मला फार एकटं वाटायचं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. अनेक महत्त्वाच्या वेळी क्रिती स्वतःच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगत असते.

पुढे अभिनेत्री प्रोफेशनल आयुष्याबद्दल म्हणाली, ‘मझ्या आयुष्यात मी कधीच कामाला पूर्णविराम देणार नाही… कारण मला काम करत राहायचं आहे… मे जे करत आहे, त्यावर माझं प्रेम आहे… मला सेटवर राहायला अधिक आवडतं…’ असं अभिनेत्री म्हणाली.

क्रिती हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री नुकताच ‘क्रु’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. आता कृती लवकरच ‘दो पत्ती’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर देखील कृती कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.