तुमचं वय घरी ठेवून या..; वर्षा उसगांवकरांना सुनावणाऱ्या निक्कीला अभिनेत्रीचा पाठिंबा

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. ‘बिग बॉस मराठी’च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने आणि डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती.

तुमचं वय घरी ठेवून या..; वर्षा उसगांवकरांना सुनावणाऱ्या निक्कीला अभिनेत्रीचा पाठिंबा
Nikki Tamboli and Varsha UsgaonkarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 10:31 AM

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. या सिझनमध्ये एकूण 16 स्पर्धक सहभागी झाले असून प्रत्येकाचं वागणं, बोलणं, स्वभाव एकमेकांपासून खूप वेगळा आहे. हे वेगळेपण असूनही बिग बॉसच्या घरात जो शेवटपर्यंत टिकून राहतो, तोच खरा विजेता ठरतो. या शोच्या पहिल्याच आठवड्यात निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं पहायला मिळालं. या भांडणादरम्यान निक्की वर्षा यांना बरंच काही बोलून जाते. ही गोष्ट बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना, सूत्रसंचालक रितेश देशमुखला आणि नेटकऱ्यांनाही पटली नाही. वर्षा उसगांवकर या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार असून त्या निक्कीपेक्षा वयानेही खूप मोठ्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत अशा पद्धतीने वागणं बरं नाही, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. मात्र या सगळ्यात एक अभिनेत्री अशीही आहे, जिने वर्षा यांना नाही तर निक्कीला पाठिंबा दिला आहे. या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मीरा जगन्नाथ आहे. मीराने बिग बॉस मराठीच्या याआधीच्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. बिग बॉसच्या घरात कोणीच छोटा किंवा मोठा कलाकार नसतो, असं तिचं म्हणणं आहे. मीराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याबद्दलची पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिने निक्कीच्या वागण्याचं समर्थन केलं आहे.

मीरा जगन्नाथची पोस्ट-

‘इथे कोणीही मान-अपमानाची अपेक्षा ठेवू नये. बिग बॉसच्या घरात कोणीही मोठा कलाकार किंवा छोटा कलाकार नसतो आणि तुमचं वय घरी ठेवून या’, असं तिने थेट म्हटलंय. ‘हे माझं मत आहे, ज्यांना पटत नसेल त्यांनी मला डीएम (डायरेक्ट मेसेज) करू नये’, असंही तिने पोस्टच्या अखेरीस स्पष्ट केलंय.

हे सुद्धा वाचा

निक्की तांबोळीवर रितेशसुद्धा भडकला होता. “वर्षा ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोललात, ती भाषा मी खपवून घेणार नाही. त्यांचं कतृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय”, अशा शब्दांत रितेशने निक्कीला सुनावलं.

नेमकं काय घडलं होतं?

‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक सदस्याला बीबी करन्सी खर्च करून सामान विकत घ्यावं लागतंय. त्यातच बेड खरेदी न केल्याने बिग बॉसने सर्वांना जमिनीवर झोपावं लागेल असे आदेश दिले. तसंच घरात दिवसभर कोणीही बेडचा वापर करू नये, असंही सांगण्यात आलं होतं. तरीही काही स्पर्धकांकडून या नियमाचा भंग झाला आणि त्याचीच शिक्षा म्हणून बिग बॉसने संपूर्ण आठवडाभार बेडचा वापर करायचा नाही, अशी शिक्षा सुनावली आहे. यावरून निक्की वर्षा यांच्यावर भडकली होती. “तुमच्यामुळे आम्हाला भोगावं लागतंय. तुम्ही बाहेर खूप मोठ्या असाल पण घरात सगळेच सारखे आहेत”, अशा शब्दांत ती उसगांवकर यांना सुनावते.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.