‘अभिनय सोडून मला तुकाराम मुंढेंच्या…’ ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्रीची मोठी इच्छा
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांवर त्यांनी धडक कारवाई केली. त्यांच्या कामाचं कौतुक आता सर्वत स्तरातून होत आहे... अशात 'मिर्झापूर' फेम अभिनेत्रीने देखील मोठी इच्छा व्यक्त केली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ विकल्या जाणाऱ्या हॉटेल आणि दुकानांवर कारवाई करत, मोठी भूमिका बजावली आहे. आता आयएएस तुकाराम मुंढे यांचे समाजमाध्यमावर शेकडो व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात त्यांच्या कामगिरीचे सामान्य जनतेला असलेले कौतूकाचे व्हिडीओ ढीगाने व्हायरल होत आहेत. त्यांच्या कामाचं कौतुक आता सेलिब्रिटींकडून देखील होत आहेत. ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्रीने तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी इच्छा व्यक्त केली आहे.
‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्री ईशा तलवार हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर तर अभिनेत्रीने मोठी इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्री म्हणते, ‘अभिनय सोडून तुकाराम भाऊंच्या टीममध्ये जाण्याचा मी विचार करतेय…’ अशी पोस्ट ईशा हिने केली आहे. एवढंच नाही तर, पोस्टमध्ये अभिनेत्रीने प्रेरणादायी असं देखील लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तीपदी नियुक्ती झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी धडक कारवायांचं सत्रच सुरू ठेवलं आहे. याचा परिणाम विविध ठिकाणी प्रत्यक्षात पहायलाही मिळत आहे. मुंबईतील स्ट्रीट फूड हा शहराच्या संस्कृतीचा जणू एक भागच आहे. वडापाव, पाणीपुरीपासून भेळ, शोरमापर्यंत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मुंबईत रस्त्याच्या कडेला मिळतात. मात्र चव, स्वस्त दर यांसोबतच स्वच्छता आणि अन्नाची सुरक्षितता हा मुद्दाही तितकाच महत्त्वाच आहे. यासाठी मोठी कारवाई सुरु आहे.
अभिनेत्री ईशा तलवार हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘मिर्झापूर’ सीरिजमध्ये अभिनेत्री माधुरी यादव या भूमिकेत झळकली. माधुरी सीरिजच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये झळकली. प्रेक्षकांनी देखील तिच्या भूमिकेला डोक्यावर घेतलं. अनेत दाक्षिणात्या सिनेमांमध्ये देखील अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘ट्यूबलाईट’, ‘कालाकांडी’, ‘रन बेबी रन’, ‘कामयाब’, ‘शर्माजी नमकीन’, ‘परछाई’, ‘मिर्झापूर’, ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिनेमा आणि सीरिजमध्ये अभिनेत्री महत्त्वाची भूमिका बजावली.
ईशा तलवार सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
