AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mona Singh | “पती परमेश्वरचा ट्रेंड संपतोय, मी खुश”; मोना सिंगच्या वक्तव्याची चर्चा

अभिनेत्री मोना सिंहने टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास स्वत:च्या अभिनयकौशल्याच्या जोरावर केला आहे. 'जस्सी जैसी कोई नहीं' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने 'थ्री इडियट्स', 'लाल सिंग चड्ढा' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Mona Singh | पती परमेश्वरचा ट्रेंड संपतोय, मी खुश; मोना सिंगच्या वक्तव्याची चर्चा
Mona SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 26, 2023 | 3:42 PM
Share

मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मोना सिंहने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘थ्री इडियट्स’, ‘लाल सिंग चड्ढा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोना विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली. भारतीय संस्कृती आणि समाजात पतीला परमेश्वर आणि देव मानण्याची परंपरा ठीक नाही, असं तिने म्हटलंय. तिच्या याच वक्तव्याची चर्चा होत आहे.

या मुलाखतीत मोना म्हणाली, “मी जेव्हा ‘क्या हुआँ तेरा वादा’ या मालिकेत काम करत होती, तेव्हा बऱ्याच महिलांना माझ्या भूमिकेतून प्रेरणा मिळाली. मला बऱ्याच लोकांचे तेव्हा मेसेज यायचे. जेव्हा एखादी महिला खचून पुन्हा उभी राहते, तेव्हा ती अधिक स्ट्राँग होते. इतक्या वर्षांपासून महिलांना दबावाखाली ठेवलंय. त्यांना प्रत्येक गोष्टीत रोखलं जातं. हे करू नका, ते करू नका. पतीला देवासमान समजा. मात्र आता हा ट्रेंड संपला आहे. आता सात जन्मांसाठी एकच पती आणि पतीला देवाचा दर्जा देण्याची वेळ संपली आहे. या बदलाने मी खूप खुश आहे. आता महिलांसोबत काहीही चुकीचं घडलं तर ती स्वत: त्याविरोधात उभी राहू शकते आणि लढू शकते.”

View this post on Instagram

A post shared by Mona Singh (@monajsingh)

मोना सिंहने इन्वेस्टमेंट बँकर श्याम राजगोपालनशी 27 डिसेंबर रोजी लग्न केलं. हिंदू विवाहपद्धतीनुसार दोघं लग्नबंधनात अडकले. मोना नुकतीच ‘कफस’ या सीरिजमध्ये झळकली होती. यामध्ये तिने एका आईची भूमिका साकारली होती. याआधी मोनाने ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात अभिनेता आमिर खानच्या आईची भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यात मोना आमिर खानपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. 40 वर्षीय मोनाने 50 वर्षीय आमिर खानच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.