हैदराबाद: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शारवानंदने त्याच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटींच्या उपस्थितीत शारवानंदने रक्षिताशी साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या खास कार्यक्रमाला RRR फेम अभिनेता रामचरणने पत्नी उपासनासह हजेरी लावली. खुद्द शारवानंदनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे, असं लिहित त्याने रक्षितासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.