अवघ्या 27 वर्षांच्या चर्चेतल्या मॉडेलवर सासूनेच झाडल्या गोळ्या? मर्डरनंतर धक्कादायक खुलासे
वयाच्या 27 व्या एका प्रसिद्द मॉडेलची हत्या करण्यात आली आहे. सासूनेच तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि सूनेचा अंत केला. आता याप्रकरणी धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

सासूने 27 वर्षीय सूनेची हत्या केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. 27 वर्षीय मॉडेल आणि कॅलिफोर्नियाची माजी ब्यूटी क्वीन कॅरोलिना फ्लोरेसच्या हत्येप्रकरणी खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. तिचा मृतदेह मेक्सिको सिटीमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये गोळी लागलेल्या अवस्थेत आढळला होता. आता याप्रकरणी धक्कादायक खुलासे समोर येत आहे. कॅलिफोर्नियाची माजी ब्यूटी क्वीन आणि मॉडेल कॅरोलिना फ्लोरेसच्या खून प्रकरणात एक सिक्योरिटी व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे.
व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे 27 वर्षीय मॉडेलची हत्या 15 एप्रिल रोजा करण्यात आली. अपार्टमेंटमध्येच कॅरोलिना हिने अखेरचा श्वास घेतला. आरोप असे आहेत की, 63 वर्षीय सासू एरिका मारिया हेरेरा कोरिएंट हिने सूनेची हत्या केली. अपार्टमेंटच्या लिव्हिंग रूममध्ये लावलेल्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेल्या सुमारे 45 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, कॅरोलिना पायजमा आणि चप्पल घालून खोलीत चालताना दिसत आहे, तर तिची सासू आधीच तिथे उभी आहे.
व्हिडीओमध्ये असंही दिसत आहे की, किचनमध्ये जायच्या आधी दोघींमध्ये बाचाबाची होता… याच दरम्यान दोघींमधील वाद टोकाळा पोहोतात… त्यांच्यामध्ये का वाद सुरु होते… याबद्दल काही ऐकू आलं नाही… त्यानंतर काही संकेंदात गोळ्याचा आवज येतो… सासू, सून कॅरोलिना हिला पाच गोळ्या झाडते… त्यानंतर सासू किचनमधून बाहेर निघते आणि मुलगा एलेजांद्रो सांचेज याला भेटते… एलेजांद्रो सांचेज हा मॉडेल कॅरोलिना हिचा पती आहे…
घरात घडलेली घटना पाहताच एलेजांद्रो सांचेज आठ महिन्यांच्या मुलाला उचलतो आणि म्हणतो की, आई तू हे काय केलंस… माझं कुटुंब होतं हे… यावर उत्तर देत मॉडेलची सासू म्हणजे, ‘तिने मला प्रचंड संताप दिला. ती माझं देखील कुटुंब होती… पण तिने मला तुझ्यापासून लांब केलं…’, याप्रकरणी पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.
सांगायचं झालं तर, कॅरोलिना हिचं जेव्हा निधन झालं, तेव्हा ती आठ महिन्यांच्या मुलाची आई होती. सासूने गोळ्या झाडल्यानंतर तात्काळ आपत्कालीन सेवा बोलावण्यात आल्या. रिपोर्टनुसार, कॅरोलिना हिला अनेक गोळ्या लागल्या होत्या. कॅरोलिना हिच्या शरीराला गंभीर जखमा झालेल्या. याप्रकरणी फॉरेन्सिक टीम कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पोलीस कॅरोलिना हिच्या मृत्यू प्रकरणी कसून चौकशी करत आहेत.
