मुघलांच्या स्वागतसाठी रामायणा…, झहीर इक्बालसोबत सोनाक्षीचं लग्न, होतेय सर्वत्र ट्रोल
Shatrughan Sinha on Daughters Wedding | झहीर इक्बाल - सोनाक्षी सिन्हा यांच्या नात्याला आई - वडिलांकडून मान्यता, पण अनेक जण ट्रोल करत म्हणत आहेत, 'मुघलांच्या स्वागतसाठी रामायणा...', अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या बंगल्याचं नाव 'रामायणा' आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लवकरच सोनाक्षी – झहीर चाहत्यांसमोर पती – पत्नी म्हणून येतील. सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. शिवाय अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा ‘रामायणा’ बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी सिन्हा कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी मात्र ट्रोल केलं आहे. ‘मुघलांच्या स्वागतासाठी ‘रामायणा’ सज्ज…’ अशा कमेंट करत ट्रोल केलं आहे.
लेक सोनाक्षी हिचं लग्न असल्यामुळे शत्रुघ्न यांनी आलिशान ‘रामायणा’ बंगला नव्या नवरीसारखा सजवला आहे. पण आता सोनाक्षी आणि झहीर यांचं लग्न एक चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की, शत्रुघ्न सिन्हा यांच्या भावांचं नाव भरत आणि लक्ष्मण आहे. मुलांचं नाव लव आणि कुश आहे, घराचं नाव ‘रामायणा’ आहे आणि त्यांची मुलगी एका मुस्लिमासोबत लग्न करत आहे… अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर देखील नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला ‘प्रेम आंधळं असतं…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘याचा अर्थ रामायणात रावणाची एन्ट्री झाली…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तुम्ही आता तुमच्या घराचं नाव बदला…’
अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मुघलांच्या स्वागतासाठी रामायणा झगमगत आहे…’, ‘सोनाक्षी दुसऱ्या धर्मातील मुलासोबत लग्न करत आहे. आता दोघांचं लग्न किती दिवस टिकतं तेच पाहू…’ असं देखील नेटकरी म्हणत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी – झाहीर यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी आणि झहीर हिंदू किंवा मुस्लिम धर्माने नाहीतर, रजिस्टर मॅरेज करणार आहेत. सोनाक्षी – झहीर दोघांचा धर्म वेगळा असल्यामुळे चर्चांना उधाण आलं. झहीर याच्या कुटुंबियांनी नात्याला लगेच मान्यता दिली. पण सोनाक्षी हिला कुटुंबियांकडून लग्नासाठी होकार मिळायला वेळ लागला.
धर्माबद्दल काय म्हणाले सोनाक्षी हिचे होणारे सासरे?
‘एक गोष्ट पक्की आहे आणि ती म्हणजे सोनाक्षी कधीच स्वतःचा धर्म बदलणार नाही. दोघे प्रेमाच्या नात्याने बांधले गेले आहेत. त्यामध्ये धर्माची कुठेच आणि कोणतीच भूमिका नाही… माझा आशीर्वाद कायम झहीर आणि सोनाक्षी यांच्यासोबत असले…’ असं सोनाक्षी हिचे होणारे सासरे म्हणाले.
