AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठमोळ्या अभिनेत्रीची का झालीये अशी अवस्था? चेहऱ्यावर सुरकुत्या, व्हीलचेअर आणि…

Marathi Actress : 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणं देखील झालंय कठीण, का झालीये अशी अवस्था... चेहऱ्यावर सुरकुत्या, व्हीलचेअर आणि..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री चर्चा...

मराठमोळ्या अभिनेत्रीची का झालीये अशी अवस्था? चेहऱ्यावर सुरकुत्या, व्हीलचेअर आणि...
| Updated on: Nov 29, 2025 | 11:16 AM
Share

Marathi Actress : सोशल मीडियावर ला कायम कोणते न कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही तर, एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा आहे… अभिनेत्रीला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसला असेल… व्हीलचेअरवर बसलेली अभिनेत्री… चेहऱ्यावरील सुरकुत्या… अभिनेत्रीची अवस्था अशी का झाली आहे. असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल… तर व्हिडीओमध्ये दिसणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री प्रिया बापट आहे… आगामी सिनेमामध्ये प्रिया बापट वृद्ध महिलेच्या भूमिकेत दिसत आहे.

व्हिडीओ खुद्ध प्रिया बापट हिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. नव्या भूमिकेत दिसणार या आनंदात अभिनेत्रीने मनातील भावना देखील व्यक्त केल्या आहे. कॅप्शनमध्ये प्रिया म्हणाली, ‘कलाकार म्हणून सतत नवीन काहीतरी करण्याची, शिकण्याची धडपड असते आणि अशी संधी फार कमी वेळा मिळते, की एखाद्या पात्राच्या वयाचे दोन महत्त्वाचे टप्पे पडद्यावर दाखवता येतात. “असंभव” या आता चित्रपटगृहात चालू असलेल्या आमच्या चित्रपटात “साधना सैगल” म्हणून मला ह्या पात्राचे 35 आणि 75 वयही पडद्यावर साकारायला मिळाले. हा मेकअप करायला 3.30 तास लागायचे. या संपूर्ण अनुभवाासाठी सगळ्या टीमचे आभार.’ सध्या प्रिया हिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते देखील लाईक्स आणि कमेंट करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

सांगायचं झालं तर, ‘असंभव’ सिनेमात प्रिया हिच्यासोबत अभिनेत्री मुक्त बर्वे देखील मुख्य भूमिकेत आहे. तब्बल आठ वर्षांनंतर प्रिया आणि मुक्ता एकत्र दिसत आहेत. मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकदा रहस्यमय प्रेमकथे भोवती फिरणाऱ्या ‘असंभव’ सिनेमात  मुख्य भूमिका साकारत आहेत. सिनेमा 21 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

‘असंभव’ सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. ‘आम्ही दोघी’ सिनेमानंतर ‘असंभव’ सिनेमात प्रिया आणि मुक्ता यांनी स्क्रिन शेअर केली आहे . उत्तराखंडमधील नैनिताल येथे सिनेमाची शुटिंग झाली आहे. “असंभव” हा एक रहस्यमय, थ्रिलर आणि भयपट आहे जो सचित पाटील दिग्दर्शित आहे आणि पुष्कर श्रोत्री सह-दिग्दर्शित आहे.

धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.