AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शब्दांशिवाय नात्यांची गोष्ट सांगणारं ‘माया’चं मोशन पोस्टर

आपण एकटेपणाला खूप घाबरतो; पण आपल्याला खरी भीती वाटते, ती पोरकेपणाची.. या कॅप्शनसह 'माया' या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मानाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मायाची एण्ट्री झाली आहे.

शब्दांशिवाय नात्यांची गोष्ट सांगणारं ‘माया’चं मोशन पोस्टर
मायाImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 20, 2026 | 9:05 PM
Share

कधी कधी एखादं चित्रच खूप काही सांगून जातं.. शब्दांशिवाय भावना व्यक्त करतं.. आणि ‘माया’ या आगामी मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर मधून नेमकं हेच दिसतं. नातेसंबंधांवर भाष्य करणारा ‘माया’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पहिल्याच नजरेत हे मोशन पोस्टर मनाला स्पर्श करून जातं. हे पोस्टर केवळ चित्रपटाची झलक देत नाही, तर नात्यांमधील जिव्हाळा, तडे, अंतर आणि स्वीकार यांचा अर्थपूर्ण संवाद घडवून आणत आहे.

मोशन पोस्टरमध्ये वेगवेगळ्या पिढ्यांतील सदस्य एकत्र दिसतात. त्यांच्या नात्यांमधील समजूतदारपणा, आपुलकी, अंतर आणि तरीही टिकून राहाणारी माया हे भाव अतिशय शांतपणे मांडण्यात आल्याचं दिसतंय. पोस्टरमध्ये मुक्ताच्या हातात दिसणारा तुटलेला कप हा केवळ अपघाताने तुटलेली वस्तू नसून, तो नात्यांमधील तडे, न बोललेली दुःखं आणि आयुष्यात येणारी पोकळी दर्शवतोय. तो कप पाहताना मनात सहज प्रश्न पडतो, एखादं नातंही असंच नकळत तुटलेलं आहे का? ज्याच्या कडा अजूनही हातात आहेत, पण ते पूर्वीसारखं पूर्ण राहिलेलं नाही? हातात तुटलेला कप असतानाही मुक्ताच्या चेहऱ्यावरचं शांत, हलकंसं हास्य हे दुःख नाकारत नाही, तर स्वीकारत आहे, असं प्रतीत करतंय.

या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ”’माया’ म्हणजे फक्त प्रेम नाही, तर एकमेकांना समजून घेणं, स्वीकारणं आणि काळाच्या ओघातही नातं जपणं. आयुष्यात सगळंच नीटनेटके असतं असं नाही. काही गोष्टी तुटतात, काही नाती बदलतात. मुक्ताच्या हातातील कप त्याचंच प्रतीक आहे, तर तिचं हास्य स्वीकाराचं. या मोशन पोस्टरमधून आम्हाला चित्रपटाची भावना शब्दांशिवाय पोहोचवायची होती.”

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित ‘माया’ चित्रपटाचे डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार, नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपट मुक्ता बर्वे, गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 27 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.