हिप्नोटाईज करुन 50 हजार लंपास, अभिनेता योगेश सोहोनीला लुटणारा दोन दिवसात गजाआड

हिप्नोटाईज करुन 50 हजार लंपास, अभिनेता योगेश सोहोनीला लुटणारा दोन दिवसात गजाआड

अपघाताची तक्रार पोलिसात द्यायची नसेल, तर सव्वा लाख रुपये दे, असं स्कॉर्पिओ चालकाने योगेश सोहनीला धमकावलं होतं (Actor Yogesh Sohoni robbery case )

अनिश बेंद्रे

|

May 21, 2021 | 11:54 AM

मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता योगेश सोहोनी (Yogesh Sohoni) याची मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लूट झाली होती. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी अत्यंत शिताफीने अवघ्या दोन दिवसात आरोपीला गजाआड केलं आहे. आपल्याला हिप्नोटाईज करुन 50 हजारांची रक्कम उकळल्याचं योगेशने सांगितलं. (Mulgi Zali Ho Serial Fame Marathi TV Actor Yogesh Sohoni robbery case on Mumbai Pune Express Way solved in two days)

“8 मे रोजी मुंबईहून पुण्याला जाताना एक्स्प्रेस वेवर मला हिप्नोटाईज करण्यात आलं. त्यानंतर दमदाटी करुन 50 हजारांची रक्कम माझ्याकडून उकळली, पण हिप्नोटाईज असल्याने मी काहीही करु शकलो नाही. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला. आणि काल रात्री त्यांनी आरोपीला शोधून काढलं. मी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपी ओळख पटवली. लवकरच त्याचा फोटोही मी शेअर करेन. या तपासात एका फोनवर मदत करणारे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि सर्व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार. गेला आठवडा मला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र आरोपीला पकडल्यामुळे निर्धास्त झालो” अशी माहिती अभिनेता योगेश सोहोनी याने फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत दिली.

नेमकं काय घडलं?

32 वर्षीय योगेश सोहोनी मुंबईतील अंधेरी भागात राहतो. तो शनिवार 8 मे रोजी सकाळी आपल्या कारने मुंबईहून पुण्याला निघाला होता. सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास उर्से टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या सोमाटणे एक्झिटजवळ पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ मागून आली. स्कॉर्पिओ चालकाने योगेशला हात दाखवून थांबण्यास सांगितले. त्यामुळे योगेशच्या ड्रायव्हरने कार थांबवली.

स्कॉर्पिओ चालकाची दमदाटी

‘तुझ्या कारमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यात एक जण जखमी झाला आहे. अपघाताची तक्रार पोलिसात द्यायची नसेल, तर तू मला सव्वा लाख रुपये दे, नाही तर मी तुझ्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करेन’ असं स्कॉर्पिओ चालकाने योगेश सोहनीला धमकावलं.

अपघात झाल्याचा बनावच

स्कॉर्पिओ चालकाने योगेशला सोमाटणे फाट्याजवळ एका एटीएममधून जबरदस्ती 50 हजार रुपये काढण्यास भाग पाडलं. ती रक्कम घेऊन स्कॉर्पिओ चालक पसार झाला. योगेशला संशय आल्याने त्याने चौकशी केली, तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कोणताही अपघात झाला नसल्याचं त्याला समजलं.

संबंधित बातम्या :

Yogesh Sohoni | ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेता योगेश सोहोनीची एक्स्प्रेस वेवर लूट

मालिकेच्या शूटिंगनिमित्त गुजरातवारी, मराठी अभिनेत्याला कोरोना संसर्ग

(Mulgi Zali Ho Serial Fame Marathi TV Actor Yogesh Sohoni robbery case on Mumbai Pune Express Way solved in two days)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें