AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओटीटीच्या आधी टीव्हीवर येणार ‘मुंज्या’; कधी अन् कोणत्या चॅनलवर पाहू शकता चित्रपट?

थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र त्यापूर्वी हा हॉरर कॉमेडी चित्रपट टीव्हीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कधी आणि कुठे ते जाणून घ्या..

ओटीटीच्या आधी टीव्हीवर येणार 'मुंज्या'; कधी अन् कोणत्या चॅनलवर पाहू शकता चित्रपट?
MunjyaImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 22, 2024 | 12:27 PM
Share

‘मुंज्या’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलंच यश मिळालं. विशेष म्हणजे प्रमोशनवर बराच पैसा खर्च न करताही फक्त ‘माऊथ पब्लिसिटी’च्या जोरावर या चित्रपटाने तगडा गल्ला जमवला होता. हा चित्रपट आता ओटीटीवर कधी स्ट्रीम होईल, याची अनेकजण वाट पाहत आहेत. मात्र ओटीटीच्या आधी हा चित्रपट प्रेक्षकांना टीव्हीवर पाहता येणार आहे. ज्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नाही, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्ही नाही, ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रीप्शन नाही, अशांनाही हा चित्रपट पाहता येणार आहे. कारण ओटीटीच्या आधी ‘मुंज्या’ हा टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिजिटल स्ट्रीमिंगच्या एक दिवस आधी हा चित्रपट टीव्हीवर येणार आहे.

कधी आणि कुठे पाहता येणार ‘मुंज्या’?

शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट ‘स्टार गोल्ड’ चॅनलवर प्रसारित होणार आहे. त्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 24 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रात्री 8 वाजता स्टार गोल्ड वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्या कुटुंबीयांसोबत या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.

थिएटरमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवरही स्ट्रीम होणार आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा चित्रपट 7 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘मुंज्या’ने जगभरात जवळपास 132 कोटी रुपयांची कमाई केली होती. या वर्षातील हा सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला होता. ‘मुंज्या’मध्ये अभय वर्माने मुख्य भूमिका साकारली होती.

अवघ्या 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ हिच्यासोबतच अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग, सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठीत ‘फास्टर फेणे’, ‘झोंबिवली’, ‘उनाड’ यांसारखे विविधांगी चित्रपट देणाऱ्या आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. ‘स्त्री’ आणि ‘भेडिया’नंतर ‘मुंज्या’ हा त्याच हॉरर-कॉमेडी मालिकेतला तिसरा चित्रपट आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.