AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mushtaq Khan: ‘वेलकम’ फेम मुश्ताक खान यांच्या निधनाने खचले कुटुंबीय, कोण आहे पत्नी? लाइमलाइटपासून दूर असतात मुलं

Mushtaq Khan: 'गदर', 'वेलकम' फेम अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. मुश्ताक हे कॅन्सरशी झुंज देत होते. अखेर 24 सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

Mushtaq Khan: 'वेलकम' फेम मुश्ताक खान यांच्या निधनाने खचले कुटुंबीय, कोण आहे पत्नी? लाइमलाइटपासून दूर असतात मुलं
मुश्ताक खानImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 25, 2026 | 8:47 AM
Share

Mushtaq Khan: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते मुश्ताक खान यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘वेलकम’, ‘गदर’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली. 24 सप्टेंबर 2026 रोजी कॅन्सरवरील उपचारादरम्यान मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. मुश्ताक खान यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याला कायम प्रसिद्धीपासून दूर ठेवलं. त्यांचा विवाह सलमा खान यांच्यासोबत झाला होता. मुश्ताक यांनी एका मुलाखतीत आपल्या प्रेमप्रकरणाबद्दलही सांगितलं होतं. प्रेमभंगानंतर त्यांनी कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अरेंज मॅरेज केलं होतं. अभिनय क्षेत्रात दीर्घकाळ काम करूनही मुश्ताक यांनी कुटुंबाला लाइमलाइटपासून दूर ठेवलं. आजारपणाच्या काळात पत्नी आणि मुलांनी त्यांना मोठा आधार दिला.

मुश्ताक खान यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव मोहम्मद अरशद खान आहे. तोसुद्धा प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत करतो. अरशदचे लग्न सबा खानशी झालं असून ती शिक्षिका आहे. कुटुंबातील बहुतांश सदस्य आपले वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक चर्चेपासून दूर ठेवतात. मुश्ताक खान यांचा छोटा मुलगा मोहसिन खान मात्र वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन क्षेत्राशी जोडला गेला. मात्र त्याने अभिनयाऐवजी दिग्दर्शन आणि निर्मितीची वाट निवडली. मोहसिनने ‘डिलिव्हरी बॉय’ या फीचर फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय म्युझिक व्हिडीओ आणि वेब प्रोजेक्ट्समध्येही त्यांनी काम केलं आहे. हिंदी आणि मराठी मनोरंजन क्षेत्रात दिग्दर्शक, निर्माता आणि स्टोरीटेलर म्हणून तो सक्रिय आहे.

मुश्ताक खान यांनी आपल्या कारकिर्दीत 500 हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. कॉमेडी आणि सपोर्टिंग भूमिकांमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. ‘वेलकम’मधील बल्लूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. चित्रपटांसोबतच त्यांनी ‘भारत एक खोज’, ‘नुक्कड’, ‘अदालत’ आणि ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही काम केलं.

मुश्ताक खान यांना काही वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. अलीकडे आजार पुन्हा बळावल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुमारे दोन आठवडे उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि 24 सप्टेंबर रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलांचा परिवार आहे. मुश्ताक खान यांनी पडद्यावर साकारलेल्या असंख्य व्यक्तिरेखा त्यांच्या चाहत्यांच्या कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने एका अनुभवी कलाकाराचा प्रवास संपला असला, तरी त्यांच्या चित्रपटांमधील भूमिका आणि मनोरंजन क्षेत्रातील योगदान कायम चर्चेत राहणार आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू